10.6 C
New York

 Manoj Jarange : मनोज जरांगे पाटलांचा नारायणगडावरून हल्लाबोल

Published:

आज दसऱ्याचा सण… बीडमधील नारायण गडावर मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange) पाटील यांचा दसरा मेळावा सुरु आहे. प्रथम या जनसमुदायाच्या चरणी मी मनापासून नतमस्तक होत आहे. खरंच वाटलं नव्हतं एवढी गर्दी होईल. मी खोटं बोलत नाही. अर्ध्याच्यावर लोकं सरकारी दवाखान्यात जातील. नजर जाईल एवढे लोकं येतील असं खरंच वाटलं नव्हतं. मला एकजण म्हणाला, ह्यँ ह्यँ केलं. ५०० एकर असतं का कुठं असं म्हणत होता. आता तो दिसत नाही. मी मीडियाला कधीच विनंती केली नाही. पण आता करतो. चारही बाजूला कॅमेरे फिरवा. तुम्ही फ्रेम दिले असले तरी एकदा मात्र हा जनसमुदाय राज्याला दिसू द्या. कानाकोपऱ्यातील बांधव दिसू द्या. एकदा दाखवाच. नुसती गर्दी पाहूनच त्यांचा कार्यक्रम होईल, असं जरांगे म्हणाले.

 Manoj Jarange मनोज जरांगे काय म्हणाले?

पाडळशिंगी पर्यंत चारही मार्ग लॉक आहे. बीडमध्ये सर्व रस्ते जाम आहेत. कधी वाटलं नव्हतं आपण या ताकदीने एकत्र याल म्हणून. हा जनसमुदाय न्यायाचा आहे. एका दुखाकडून सुखाकडे जायचं आहे. या समुदायावर संस्कार आहेत. संस्कार. ते संस्कार कधीच जातीवाद करत नाहीत. प्रचंड ताकदीने असणारा हा समुदाय आहे. या राज्यावर समुद्रासारखा पसरला आहे. पण कधीच मस्तीत आणि मग्रुरीत हा समाज वागत नाही. कधीच हा समुदाय मस्तीत आणि मग्रुरीत वागला नाही. प्रत्येकाला सांभाळण्याचं, साथ देण्याचं काम केलं आहे. यांनी कधी जातीवाद केला नाही. त्यांना कधी जात शिवली नाही, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

आता वचपा काढण्याची वेळ, राज ठाकरेंनी शुभेच्छा देताना केलं ‘हे’ आवाहन

हा जनसमुदाय न्यायाचा आहे. दु:खाकडून सुखाकडं जाण्यासाठी हा समाज एकत्र आला आहे. या सगळ्या समुदायावर एक संस्कार आहेत. हे कधीच जातीवाद करत नाहीत. (Manoj Jarange Patil) या जनसमुदायाची प्रचंड संख्या आहे. पण हे कधीच मस्तीत आणि मग्रुरीत वागत नाहीत. तर, प्रत्येकाला सोबत घेण्याचं, साथ देण्याचं काम केलं आहे. त्यांना कधीच जात चिकटली नाही अशा शब्दांत मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या भाषणाची सुरूवात केली. ते दसरा मेळाव्यानिमित्त आयोजीत कार्यक्रमात नारायण गडावर बोलत होते. यावेळी लाखोंचा मराठा समाज येथे एकत्र झाल्याचं चित्र पाहायला मिळाल. एकदा साथ देण्याचं ठरवल तर तुम्ही मागं हटत नाहीत. तसंच, ठरवल तर कार्यक्रमच करता असं म्हणत लोकसभेला समाजाने कशी योग्य भूमिका घेतली असं जरांगे पाटील यावेळी म्हणाले आहेत.

Manoj Jarange मनोज जरांगेंनी मराठा समाजाकडून घेतलं वचन

मनोज जरांगे पाटील यांनी नारायण गडावरून बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी मराठा बांधवांकडून शब्द घेतला. मला एकच वचन द्या, मला तुमच्याकडून जास्त काही नको. तुम्ही मला एकच वचन द्या. मग मी मात्र तुम्ही म्हणाल ते करेल. फक्त हट्ट धरू नका. एकच वचन द्या, असं जरांगे म्हणाले नारायण गडावरच्या सभेत म्हणालेत.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img