10.6 C
New York

Devendra Fadnavis : होमगार्ड्ससाठी गुडन्यूज! मानधनात होणार दुप्पट वाढ; देवेंद्र फडणवीसांची घोषणा..

Published:

राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांच्या बरोबरीने होमगार्ड्स देखील महत्त्वाची भूमिका बजावत असतात. असे असले तरी गेल्या काही दिवसांपासून होमगार्ड्सचे मानधन वाढविण्यासंदर्भात मागणी केली जात होती. आज अखेर दसऱ्याच्या मुहूर्तावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून (Devendra Fadnavis) ही मागणी मान्य करण्यात आली आहे. राज्यातील होमगार्ड्सचे मानधन दुप्पट करण्यासंबंधीचा शासन आदेश जारी करण्यात आला आहे. त्यामुळे आता सरकारने निर्णय घेतला आहे. होमगार्ड्सच्या मानधनात दुप्पट वाढ करण्यात आली आहे. याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करत दिली आहे.

राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यात पोलिसांना होमगार्ड्सची अनेकदा मदत होते. सण उत्सवांचा काळ असो किंवा एखादा आपत्कालीन प्रसंग.. पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून काम करतात ते होमगार्ड्स. या होमगार्ड्सना आज एक आनंदाची बातमी मिळाली आहे. आज विजयादशमीच्या मुहूर्तावर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी (Devendra Fadnavis) होमगार्ड्सची अनेक वर्षांपासूनची मागणी मान्य केली आहे. होमगार्डसच्या मानधनात दुप्पट वाढ करण्यात आली आहे. विजयादशमी दिनी राज्यातील लाखो होमगार्ड्सची मागणी राज्य सरकारने मंजूर केली आहे.

अपघातग्रस्त अनुदान योजनेचं कवच, धनंजय मुंडेंनी मानले आभार

यासंदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या एक्स हँडलवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे, की राज्यातील होमगार्ड्सचे मानधन जवळजवळ दुप्पट करण्यासंबंधीचा शासन आदेश जारी करण्यात आला आहे. प्रतिदिन 570 रुपयांवरून ते आता 1083 रुपये इतके करण्यात आले आहे. आता हे मानधन देशात सर्वाधिक आहे. याशिवाय विविध भत्त्यांची रक्कम सुद्धा दुप्पट करण्यात आली आहे. उपहार भत्ता 100 रुपयांवरून 200 रुपये तर भोजन भत्ता 100 वरून 250 रुपये करण्यात आला आहे. राज्यातील सुमारे 55 हजार होमगार्ड्सना या निर्णयाचा लाभ मिळेल. 1 ऑक्टोबर 2024 पासून ही वाढ देण्यात येईल. गेल्याच महिन्यात सुमारे 11,207 होमगार्ड्सची भरती प्रक्रिया सुद्धा पूर्ण करण्यात आली आहे. सध्या त्यांचे प्रशिक्षण करण्यात येत आहे. सर्वांना विजयादशमीच्या शुभेच्छा..

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img