7.2 C
New York

Junnar : पेंढार येथे बिबट्याच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू 

Published:


ओतूर,प्रतिनिधी:दि.९ ( ऑक्टोबर ) रमेश तांबे 


जुन्नर (Junnar) तालुक्यातील पिंपरी पेंढार येथील पीर पट परिसरात बुधवारी दि.९ रोजी पहाटेच्या सुमारास बिबट्याने हल्ला केल्याने सुजाता रवींद्र डेरे वय ४२ वर्ष या महिलेचा जागीच मृत्यू झाला असल्याची दुर्दैवी घटना घडल्याने या परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
जुन्नर तालुक्यात बिबट्याचे मानवी हल्ले हे नित्याचे झाले असून दि.२४ सप्टेबर रोजी जुन्नर तालुक्यातील तेजेवाडी येथे  रूपेश तान्हाजी जाधव या आठ वर्षीय मुलाला बिबट्याने हल्ला करून ठार केल्याची घटना ताजी असतानाच बुधवारी दि.९ रोजी पहाटे दुर्दैवी घटना घडल्याने यात ४२ वर्षीय सुजाता डेरे यांना आपला जीव गमवावा लागलेला आहे. 

जुन्नर तालुक्यात वारंवार होणाऱ्या बिबट्याच्या मानवी हल्ल्यांचा कायमचा तोडगा निघणार आहे का ? असा संतप्त सवाल उपस्थितांकडून वन विभागाच्या अधिकाऱ्यांना केल्या जात आहे बिबट्याला ठार करा नाहीतर आम्हाला गोळ्या घाला असा पवित्रा काही ग्रामस्थांनी घेतल्यामुळे परिसरात संतप्त वातावरण पाहायला मिळाले.

मागील सहा महिन्यांपूर्वी शिरोली खुर्द शिवारात गुरूवारी दि.११ एप्रिल २०२४ रोजी पहाटेच्या सुमारास संस्कृती संजय कोळेकर, वय दीड वर्ष,मुळ रा.धोत्रे, ता.पारनेर,जि.अहमदनगर, सध्या रा.शिरोली खुर्द,ता.जुन्नर, जि.पुणे या दीड वर्षाच्या चिमुरडीवर बिबट्याने हल्ला केल्याने तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यानंतर दि.८ मे २०२४ रोजी रोजी काळवाडी येथे रूद्र फापाळे या चिमूरड्यावर बिबट्याने हल्ला केल्याने, त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. आणि मागील पाच महिन्यांपूर्वी आजच्या घटनेच्या फक्त पाचशे मीटर अंतरावर १० मे २०२४ रोजी पिंपरी पेंढार ता.जुन्नर येथील गाजरपटात शेतात बाजरी राखणीचे काम करणाऱ्या बिबट्याने हल्ला केल्याने नानूबाई सिताराम कडाळे वय ५५ वर्षे या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. या एकामागून एक अशा बिबट्याच्या हल्ल्याच्या सलग घडणाऱ्या घटनांमुळे संपूर्ण जुन्नर तालुका हादरला असून शेतकऱ्यांमध्ये कमालीचे भीतीचे वातावरण पसरलेले आहे.

करोडो गरिबांची दसरा-दिवाळी गोड! डिसेंबर 2028 पर्यंत मोफत तांदूळ देण्याचा मोदींचा निर्णय

घटनास्थळी जुन्नरचे तहसीलदार डॉ.सुनील शेळके,आमदार अतुल बेनके,श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर, माजी आमदार शरद सोनवणे, मनसेचे जुन्नर तालुकाध्यक्ष तानाजी तांबे,जिल्हा परिषद गटनेत्या आशा बुचके, जुन्नरचे उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर,

जुन्नरचे उपवनसंरक्षक अमोल सातपुते, सहाय्यक वनसंरक्षक स्मिता राजहंस, जुन्नरचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण,ओतूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक लहू थाटे तसेच परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते वनविभागाचे कर्मचारी देखील घटनास्थळी उपस्थित होते. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी घटनास्थळी वनविभागाने २० पिंजरे लावले आहेत. तसेच १० ट्रॅप कॅमेरे लावले असून थर्मल ड्रोन च्या साह्याने शोधकार्य सुरू असल्याचे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img