7.2 C
New York

Jayant Patil : जयंत पाटलांनी पक्षप्रवेशावेळी हर्षवर्धन पाटलांना थेटच सांगितलं

Published:

कार्यकर्त्यांना विचारून आपण हा निर्णय केला असं हर्षवर्धन पाटील म्हणाले. परंतु, आता कार्यकर्ते वगैरे चालणार नाही. आता हाच पक्ष आणि हे काम असं म्हणत पक्ष प्रवेशावेळीच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी हर्षवर्धन पाटील यांना चांगलाच दम भरला आहे. (Jayant Patil) ते आज इंदापूर येथे हर्षवर्धन पाटील यांच्या पक्षप्रवेश सोहळ्यात बोलत होते. यावेळी व्यासपिठावर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते पाटील उपस्थित होते.

Jayant Patil 200 टक्केसरकार येणार

ज्या बहिणी लाडक्या नव्हत्या त्या लाडक्या झाल्या. तुम्ही मतदान करून बाहेर आला की तुम्हाला तेच मिळणार जे या मतदारसंघात बहिणीला द्यायची प्रथा आहे. महाविकास आघाडी चांगल्या योजना तुमच्यासाठी आणेल. गृहमंत्री नागपूरचे आहेत. तिथं पोलीस टेबलवर बसून जुगार खेळताना महाराष्ट्राने पाहिले आहे. महाविकास आघाडीचे सरकार 200 टक्के सत्तेत येणार आहे असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Jayant Patil अनेक लोक उत्सुक

सरकारने आता ज्या योजना देण्याचा निर्णय घेतलाय ते करताना कुठलंही नियोजन केलं नाही. त्यामुळे अनेक योजना बंद पडल्यात. आमचं सरकार आल्यानंतर आणखी चांगल्या योजना राबवू. मी महिला सुरक्षिततेची हमी देतो. आपल्याला इंदापूर विधानसभेची जागा निवडून आणायची आहे. साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करण्यासाठी अनेक लोक उत्सुक आहेत अस सुचक वक्तव्यही त्यांनी यावेळी केलं.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img