ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या दिवशी सर्वसामान्यांना चटका देणारी बातमी समोर आली आहे. या महिन्याच्या पहिल्याचं दिवशी गॅस सिलेंडरचे (LPG cylinder) भाव वाढले असून सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसणार आहे. (Cylender ) वाढलेल्या या सिलेंडरच्या किमतींमुळे व्यावसायिक सिलेंडरच्या किमती 1900 रुपयांच्या पुढे गेल्या आहेत.नव्या दरानुसार आता व्यावसायिक एलपीजी सिलेंडर 50 रुपयांनी महागला आहे. नवीन दर इंडेन सिलेंडर असून आजपासून दिल्लीत एलपीजी व्यावसायिक सिलेंडर 1740 रुपयांना मिळणार आहे. असे असले तरी घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. 14 किलोच्या सिलेंडरची किंमत 803 रुपये आहे. (Commercial LPG cylinder cost by Rs 50 from today)
इंडियन ऑइलने जारी केलेल्या नवीन दरांनुसार, आजपासून मुंबईत व्यावसायिक एलपीजी सिलेंडरची किंमत 1692.50 रुपये, कोलकाता येथे 1850.50 रुपये आणि चेन्नईमध्ये 1903 रुपये असा मिळणार आहे. कोलकातामध्ये 19 किलोचा एलपीजी सिलेंडर आजपासून 48 रुपयांनी महागला आहे. असे असले तरी या तिन्ही ठिकाणी घरगुती सिलेंडरच्या दरात कोणतीही वाढ झालेली नाही. कोलकातामध्ये 829 रुपये आणि मुंबईत 802.50 रुपये दराने घरगुती सिलेंडर उपलब्ध आहे. तर चेन्नईमध्ये सप्टेंबरच्या 818.50 रुपये दराने आजही घरगुती सिलेंडर उपलब्ध आहे. याशिवाय दिल्लीत 14.2 किलोचा घरगुती एलपीजी सिलेंडर 803 रुपयांच्या जुन्या दराने उपलब्ध आहे. यापूर्वी सप्टेंबरमध्येही एलपीजी सिलिंडरचे दर सुमारे 39 रुपयांनी वाढून 1691.50 रुपयांवर पोहोचले होते. दर वाढण्यापूर्वी सिलेंडरचे दर 1652.50 रुपये होते.
‘इमर्जन्सी’तील कटवर कात्री चालवल्यास मिळू शकतं प्रमाणपत्र
LPG cylinder इतर राज्यातील सिंलेडरचे दर वाढले
गुरुग्राममध्ये व्यावसायिक सिलेंडर किंमत 1756 रुपयांपर्यंत वाढली आहे, मात्र घरगुती सिलेंडरची किंमत 811.50 रुपयांवर स्थिर आहे. पाटणा आणि बिहारमध्येही सिलेंडर महागला आहे. पाटणामध्ये आजपासून व्यावसायिक सिलेंडर 1995.5 रुपयांना मिळेल तर घरगुती सिलेंडर 892.50 रुपयांच्या जुन्या दराने उपलब्ध आहे. आग्रा, उत्तर प्रदेशमध्ये व्यावसायिक सिलेंडरचा दर 1793.5 रुपये झाला आहे, मात्र या दोन्ही ठिकाणी घरगुती एलपीजी सिलेंडरची किंमत 815.5 रुपये आहे. लखनऊमध्ये व्यावसायिक एलपीजी सिलेंडर 1861 रुपयांना मिळणार आहे. तर घरगुती एलपीजी सिलेंडर 840.5 रुपयांना आहे. जयपूर, राजस्थानमध्येही 19 किलोच्या सिलेंडरची किंमत आता 1767.5 रुपये आहे. तर घरगुती एलपीजी सिलेंडर 806.50 रुपये आहे.