19.1 C
New York

Maharashtra Politics : फडणवीस अन् उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट’, काय आहे प्रकरण?

Published:

येत्या नोव्हेंबर महिन्यात विधानसभा निवडणुका होणार आहे. (Maharashtra Politics) याचपार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडीकडून मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. खासकरून भाजपा आणि ठाकरे गट एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसतात. मात्र आता हे दोन्ही पक्ष एकत्र येणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी दिल्लीत भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांचीही भेट घेतल्याचा दावा वंचित बहुजन आघाडीने केला आहे. तसेच या भेटीनंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात बैठक झाल्याचे म्हटले आहे. वंचितच्या या दाव्यावर भाजपा आणि ठाकरे गटाकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. (Vanchit Bahujan Aghadi claims that BJP and Thackeray group will unite)

वंचित बहुजन आघाडीचे मुख्य प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी एक व्हिडिओ शेअर करत दावा केला आहे की, संजय राऊत यांनी 25 जुलै रोजी ‘7 डी मोतीलाल मार्ग’ येथे रात्री दोन वाजता जेपी. नड्डा यांची भेट घेतली. यानंतर 5 ऑगस्ट रोजी मध्यरात्री 12 वाजता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मातोश्री निवासस्थानी उद्धव ठाकरेंची भेट घेण्यासाठी एकटेच पोहचले. या दोघांमध्ये 2 तास बैठक झाली. यानंतर उद्धव ठाकरे 6 ऑगस्टला दिल्लीला गेले. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी दिल्लीत कोणा-कोणासोबत भेट घेतली, याचा खुलासा करावा, अशी मागणी त्यांनी केली.

पुण्यातील सामूहिक अत्याचाराविरोधात, सुप्रिया सुळे म्हणाल्या…

सिद्धार्थ मोकळे म्हणाले की, आम्ही मिळालेली माहिती लोकांसमोर ठेवत आहोत. त्यामागील कारण म्हणजे भाजपा आणि त्यांचे मित्र पक्ष आरक्षणाच्या विरोधात आहेत, तर दुसरीकडे राज्यातील आरक्षणवादी मतदारांनी शिवसेनेच्या उमेदवारांना आणि उद्धव ठाकरेंना मतदान केले आहे. गेल्या 5 वर्षातील राजकीय घडामोड लक्षात घेता, उद्या राज्यात काही विपरीत घटना घडल्यास आरक्षण मतदारांची फसवणूक होऊ नये, यासाठी आम्ही ही माहिती शेअर करत आहोत.

दरम्यान, वंचित बहुजन आघाडीने अशावेळी दावा केला आहे, जेव्हा शिवसेना-भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस जागावाटपाचा फॉर्म्युला लवकरच ठरवणार असल्याचा दावा करत आहेत. तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार महायुतीत नाराज असल्याची चर्चा सुरू आहे. भाजपा आणि शिंदे गट जाणीवपूर्वक अजित पवार गटाची कोंडी करण्याचा प्रयत्न करत आहेत, जेणेकरून ते स्वत:हून महायुतीमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतील, अशी रणनीती आखण्यात आल्याची कुजबुज राजकीय वर्तुळात सुरू आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img