‘धर्मवीर’ चित्रपटानंतर याच्या सीक्वलच्या चाहते प्रतिक्षेत होते. अखेर 27 सप्टेंबरला ‘धर्मवीर 2 : साहेबांच्या हिंदुत्त्वाची गोष्ट’ (Dharmveer 2 Movie) सिनेमा प्रदर्शित झाला. (Marathi Movie) धर्मवीर प्रमाणेच त्याच्या सीक्वलला देखील प्रेक्षकांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. प्रसाद ओक मुख्य भूमिकेत असलेल्या ‘धर्मवीर 2’ चित्रपटाला प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून घेतलं आहे. (Box Office Collection ) या चित्रपटाने शो सगळीकडे हाऊसफूल होत आहेत. तर ‘धर्मवीर 2’ पाहण्यासाठी प्रेक्षक सिनेमागृहात गर्दी करत आहेत. चला तर मग ‘धर्मवीर 2’चं 4 दिवसांचं बॉक्स ऑफिस कमाई किती झाली जाणून घ्या…
सीक्वलच्या चाहते प्रतिक्षेत होते. अखेर 27 सप्टेंबरला ‘धर्मवीर 2 : साहेबांच्या हिंदुत्त्वाची गोष्ट’ (Dharmveer 2 Movie) सिनेमा प्रदर्शित झाला. (Marathi Movie) धर्मवीर प्रमाणेच त्याच्या सीक्वलला देखील प्रेक्षकांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. प्रसाद ओक मुख्य भूमिकेत असलेल्या ‘धर्मवीर 2’ चित्रपटाला प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून घेतलं आहे. (Box Office Collection ) या चित्रपटाने शो सगळीकडे हाऊसफूल होत आहेत. तर ‘धर्मवीर 2’ पाहण्यासाठी प्रेक्षक सिनेमागृहात गर्दी करत आहेत. तब्बल 1.92 कोटींचा गल्ला ‘धर्मवीर 2 ‘ चित्रपटाने प्रदर्शनाच्या दिवशी जमवला. 2024 या वर्षातील पहिल्या दिवशी सर्वाधिक कमाई करणारा ‘धर्मवीर 2’ मराठी चित्रपट ठरला. त्यानंतर वीकेंडलाही या चित्रपटाला प्रेक्षकांकडून भरभरुन प्रतिसाद मिळाला. दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 2.35 कोटींची कमाई केली.
घरात आज येणार स्पेशल गेस्ट ! होणार ग्रँड सेलिब्रेशन
तिसऱ्या दिवशीही ‘धर्मवीर 2’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई केली आहे. तर चौथ्या दिवशी 9.27 कोटींचा गल्ला कमावला आहे. अवघ्या चार दिवसांत प्रसाद ओकच्या ‘धर्मवीर 2’ चित्रपटाने देशात 17.19 कोटींचा गल्ला जमावला आहे. आता ‘धर्मवीर 2’ चित्रपट कमाईच्या बाबतीत बॉक्स ऑफिसवर नवा रेकॉर्ड रचतो का, हे पाहणं मोठ्या औत्सुक्याचं असणार आहे.
‘धर्मवीर 2’ चित्रपटात प्रसाद ओकने आनंद दिघे यांची भूमिका साकारली आहे. या चित्रपटातून आनंद दिघेंच्या हिंदुत्वाची गोष्ट प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. प्रविण तरडेंनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. या चित्रपटात प्रसाद ओकबरोबर क्षितीश दाते, स्नेहल तरडे हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.