21.7 C
New York

Ajit Pawar : अजित पवारांचा महाविकास आघाडीवर निशाणा, म्हणाले

Published:

राष्ट्रवादीची जनसन्मान यात्रा सध्या सुरु आहे. आज ही यात्रा बीडच्या परळीत असणार आहे. या यात्रेआधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. तेव्हा त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला. जसजशी निवडणूक जवळ यायला लागली आहे तसं विरोधक सातत्याने ही कंपनी राज्याबाहेर जाणार आहे. ती कंपनी राज्याबाहेर जाणार आहे, असं विरोधक म्हणत आहेत. पण तुम्ही टीव्हीवर जाहिराती पाहात असाल की कोणती कोणती कंपनी महाराष्ट्रात गुंतवणूक करत आहे. त्यामुळे विरोधकांच्या दाव्याला काही अर्थ नाही. निवडणुकीच्या तोंडावर ते असे आरोप करत आहेत, असं म्हणत अजित पवार यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे.

Ajit Pawar विकासकामांवर भाष्य

दोन दिवसाआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील विकासकामांचं ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन केलं. किर्लोस्कर टोयोटा कंपनी जी बंगळुरुला आहे. त्यांचा ते महाराष्ट्रात विस्तार करत आहेत. संभाजीनगरला ते नवीन प्लॅट उघडत आहेत. जेएसडब्लू आपल्याकडे 40 हजार कोटींची गुंतवणूक करत आहेत. अमरावतीला भूमिपूजन झालं आहे. त्यामुळे विरोधकांकडे काही मुद्दा नाही म्हणून ते सरकार आरोप करत आहेत. त्यात काही तथ्य नाही, असं अजित पवार म्हणाले. राज्यातील उद्योग राज्याबाहेर जात असल्याच्या विरोधकांकडून करण्यात येत आहे. यावर अजित पवार यांनी उत्तर दिलं आहे.

राहुल गांधींचा पंतप्रधानांवर घणाघात, दिल्लीत काय घडलं?

Ajit Pawar लाडकी बहीण योजनेवर भाष्य

2500 कोटी काल कॅबिनेटमध्ये मंजूर झाले आहेत. निवडणुकांच्या पुढे विरोधकांकडून आरोप होत आहेत. नवीन नवीन उद्योग आपल्याकडे येत आहेत. अनेक ठिकणी राज्यात गुंतवणुक होत आहेत. मुद्दे कुठले नाहीत म्हणून सहानुभुती मिळवण्याचा प्रयत्न होत आहे. गुंतवणुकदारांना सवलती दिल्या जात आहेत. लाडकी बहिण योजनेवर विरोधकांकडून आनेक आरोप केले जातायेत. अफवा उठवण्यात येत आहे. आलेले पैसे लवकर काढून घ्या, ते परत जातील, असं काही लोक म्हणाले. काहींनी तर आम्ही सरकारमध्ये आल्यानंतर ही योजना बंद करू असंही म्हटलं. पण ही योजना महिलांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात लोकप्रिय झाली आहे, असं अजित पवारांनी म्हटलं आहे.

राज्यात मोठ्या प्रमाणात विकासकामं चालू आहेत. मी विकासा बद्दल बोलतोय, कोण काय बोलतोय त्यावर मी बोलत नाही. मी काल भाषणात एकदाही विरोधकांवर टीका केला नाही. मी राज्याच्या विकासावर बोलतोय. राज्याच्या हिताची काम करण्यावर आमचा जोर आहे, असं अजित पवार म्हणाले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img