आज सोमवार ( दि. 30 सप्टेंबर) रात्री 12.30 ते मंगळवारी सकाळी 4.30 या दरम्यान गोरेगाव आणि मालाड (Western Railway block) दरम्यान रात्रकालीन ब्लॉक असणार आहे. चर्चगेट-विरार लोकल रात्री 11.27 वाजता रात्री शेवटची सुटेल. त्यानंतर रात्री एक वाजता चर्चगेट अंधेरी ही लोकल असेल. बोरीवलीहून चर्चगेटला रात्री 12.10 वाजता, तर गोरेगाव ते सीएसएटी रात्री 12.07 वाजता शेवटची लोकल सुटेल. उद्या मंगळवारी काही लोकल अतिरिक्त म्हणून चालवण्यात येणार असल्याची माहिती आहे.
ब्लॉकच्या कालावधीमध्ये काही रेल्वे पूर्णपणे तर काही अंशत: रद्द करण्यात आल्या आहेत. १७५ रेल्वे रेल्वेच्या माहितीनुसार, रद्द करण्यात आल्या आहेत. 4 ऑक्टोंबरपर्यंत पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांना अनियमित वेळापत्रकानुसार चालावं लागणार आहे. १० चे १२ मिनिटे उशिरा अप, डाऊन मेल आणि एक्स्प्रेस धावण्याची शक्यता आहे. तसंच, अप आणि डाऊन हार्बर लाईनवर 00:30 ते 10:30 वाजेपर्यंत 10 तासांचा मेजर ब्लॉक आणि अप आणि डाऊन जलद व धीम्या लाईनवर 00:30 ते 04:30 वाजेपर्यंत 04 तासांचा ब्लॉक घेण्यात येईल.
मोठी बातमी! महाराष्ट्र सरकार आर्थिक डबघाईला
पश्चिम रेल्वेवरील गोरेगाव आणि कांदिवली स्थानकांदरम्यान मार्गावर ब्लॉक घेण्यात आला आहे. रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, 6 च्या लाईनचे बांधकाम सुलभ करण्यासाठी गोरेगाव आणि कांदिवली स्थानकांदरम्यान आज 30 सप्टेंबर रोजी 21:30 ते 07:30 वाजेपर्यंत 5च्या लाईनवर 10 तासांचा मेजर ब्लॉक घेण्यात येईल. चर्चगेट ते अंधेरी आणि विरार ते बोरीवली दरम्यानच ब्लॉक कालावधीत 00.30 ते 04:30 वाजेपर्यंत 04 तासांच्या ब्लॉक दरम्यान फक्त गाड्या चालवल्या जातील.