19.1 C
New York

Bigg Boss Marathi : ‘बिग बॉस मराठी’च्या घराचा पंढरीनाथ कांबळेने घेतला निरोप

Published:

मराठी मनोरंजनसृष्टीतील एक विनोदी अभिनेता पंढरीनाथ कांबळे (Padarinath Kamble) उर्फ पॅडी कांबळे आहे. (Bigg Boss Marathi Season 5) हास्यसम्राट पंढरीनाथ कांबळेने (Padarinath Kamble) मालिका, नाटक आणि चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हसू आणण्याचं काम केलं आहे. (Bigg Boss Marathi ) वेगवेगळी कॅरेक्टर्स करणारा हा माणूस स्वतःच एक कॅरेक्टर आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या घरातदेखील त्याच्या या कॅरेक्टरने प्रेक्षकांची मने जिंकली.

‘बिग बॉस मराठी’च्या घरातील सर्वच सदस्य या आठवड्यात नॉमिनेट (Nominate) होते. कालच्या भागात त्यामुळे निक्की, सूरज या सदस्यांना सेफ करण्यात आलं. अंतिम टप्प्यात ‘बिग बॉस मराठी’चा खेळ आलेला असताना या आठवड्यात घरातून कोण बाहेर पडणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. अंकिता आणि पॅडी दादा या दोन सदस्यांमध्ये शेवटी चुरस रंगली. यापैकी अंकिताला ‘बिग बॉस’ने सेफ केलं. तर प्रेक्षकांनी दिलेल्या मतांचा मान ठेवत पंढरीनाथ कांबळेला या आठवड्यात घराचा निरोप घ्यावा लागला. खरंतर एक वेगळाच पॅडी ‘बिग बॉस मराठी’च्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.

जेष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना दादा साहेब फाळके पुरस्कार जाहीर

पंढरीनाथ कांबळे ‘बिग बॉस मराठी’च्या घराचा निरोप घेत म्हणाले,’बिग बॉस मराठी’च्या घरातील माझ्या प्रवासाबद्दल मी खूप आनंदी आहे. आता मी बाहेर पडलो याबद्दल मला अजिबात वाईट वाटत नाही आहे. कोणाला मी दुखावलं नाही, कोणाला उलट उत्तर दिलेलं नाही. मी माझे मुद्दे प्रत्येक वेळेत व्यवस्थित मांडले आहेत. घरातील प्रत्येकाचा मी आदर केला आहे. त्यामुळे आज निरोप घेताना मला अजिबातच दु:ख होत नाही आहे’.

पॅडी पुढे म्हणाला,’फिनालेपर्यंत यायची इच्छा होती. मी माझ्या पत्नीला ‘बिग बॉस मराठी’च्या घरात असताना खूप मीस केलं. मला सूरजची पण आता बाहेर पडल्यानंतर नक्कीच आठवण येईल. डीपी, अंकिताचीदेखील आठवण येईल. त्यांच्याबद्दल एक आत्मियता निर्माण झाली आहे. हे सर्व त्यांच्या मतांवर ठाम आहेत.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img