21.7 C
New York

NCP Symbol Case : विधानसभेपूर्वी अजित पवारांना धक्का, मिळणार नवीन चिन्ह?

Published:

केंद्रीय निवडणूक आयोगाकडून आता कोणत्याही दिवशी विधानसभेसाठी निवडणुकांची घोषणा होऊ शकते. (NCP Symbol Case) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार (NCP Sharad Chandra Pawar) पक्षाच्या वतीने त्यामुळे पक्ष आणि चिन्हाबाबात तातडीने सुनावणी करण्यात यावी अशी मागणी रासर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) करण्यात आली आहे.

या मागणीचा विचार करून सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात सुनावणीसाठी 1 ऑक्टोबरची तारीख निश्चित केली आहे. तसेच या प्रकरणात 1 ऑक्टोबरलाच निर्णय येण्याची शक्यता आहे. अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) नवं चिन्ह द्या आणि या याचिकेवर जेव्हापर्यंत निकाल लागत नाही तेव्हापर्यंत घड्याळ चिन्ह वापरण्यास बंदी घाला, अशी मागणी शरद पवार गटाकडून सर्वोच्च न्यायालयात करण्यात आली आहे. शरद पवार गटाकडून तसेच अजित पवार गटाला नवीन निवडणूक चिन्ह देण्यात यावे अशी मागणी देखील करण्यात आली आहे.

विधानसभा निवडणुकीची तयारी काय? निवडणूक आयुक्तांची घोषणा

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाला लोकसभा निवडणुकीत पिपाणी शरद पवार गटाकडून या चिन्हामुळे मोठा फटका बसला आणि एक खासदार जिंकता जिंकता हरला असा दावा करण्यात आला होता तसेच याबाबत शरद पवार (Sharad Pawar) यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार देखील दाखल केली होती. सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका तर दुसरीकडे यापूर्वी दाखल करून घेण्यास नकार दिला होता त्यामुळे सर्वोच्च न्यायालयात 1 ऑक्टोबरला होणाऱ्या सुनावणीत सुप्रीम कोर्ट काय निर्देश देणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img