13.2 C
New York

Ranjitsinh Mohite Patil : रणजीतसिंह मोहिते पाटील खरंच काँग्रेसच्या वाटेवर?

Published:

मोठे-मोठे राजकीय भूकंप विधानसभा तोंडावर आल्याने पाहायला मिळणार आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात 2019 नंतर एकाच पक्षाचे दोन पक्ष अशी सध्याची स्थिती आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांना धक्के बसण्याची शक्यता आहे. नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार पश्चिम महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप होणयाची शक्यता आहे. (Election) रणजितसिंह मोहिते पाटील हे कांग्रेसमध्ये जाण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. मोहिते यांनी दिल्लीत जाऊन काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची घेतली भेट घेतल्याचीही माहिती आहे. काँग्रेसच्या हायकमांडशी माढा विधानसभा लढवण्याबाबत चर्चा होऊन त्यावर लवकरच तोडगा निघण्याची शक्यता आहे. उद्या अकलूजमध्ये याबद्दल राज्यातील काँग्रसचे नेते चर्चा करणार असल्याचीही सुत्रांची माहिती आहे.

Ranjitsinh Mohite Patil निकटवर्तीयांकडून स्पष्टीकरण

रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या कुटुंबाने अकलुज येथे महाविकास आघाडीतील 30 खासदारांचा सत्कार सोहळा उद्या रविवार (दि. २९ सप्टेंबर) रोजी आयोजीत केलेला आहे. या सोहळ्यात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशिलकुमार शिंदे यांचा सत्कार केला जाणार आहे. तसंच, शरद पवार यांचाही सत्कार करण्यात येणार आहे. रणजितसिंह मोहिते पाटील हा कार्यक्रम आयोजित केल्यामुळे हे काँग्रेसमध्ये जाणार अशा चर्चा रंगल्या आहेत. मात्र, त्याच्यामध्ये तथ्य नसल्याचे मोहिते पाटलांच्या निकटवर्तीयांनी स्पष्ट करण्यात आलं आहे. तसंच, सध्या मोहिते पाटलांचा तसा कोणताही विचार नाही असंही निकटवर्तीयांकडून सांगण्यात आलं आहे. त्याचबरोबर माध्यमांमध्येही अशा पद्धतीचा खुलासा केल्याचं निकटवर्तीयांकडून सांगण्यात आलं आहे. सुशिलकुमार शिंदे यांच्या सत्कार सोहळ्याने या चर्चा सुरू झाल्या असंही त्यांनी म्हटलं आहे.

सिनेट निवडणुकीतील विजयानंतर राऊतांचा सत्ताधाऱ्यांना टोला

Ranjitsinh Mohite Patil दबदबा अजूनही कायम

मोहिते पाटील आणि सोलापूर असे एक समिकरण आहे. मोहित पाटील यांनी या जिल्ह्यात आपला दबदबा अजूनही कायम ठेवला आहे. शिवाय त्यांनी लोकसभेत आपली ताकद ही दाखवून दिली आहे. मोहिते पाटील कुटुंबाची त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत इच्छुकांना मर्जी सांभाळावी लागणार आहे. मोहिते पाटील कुटुंब पाठीशी असतील तर विजय निश्चित असं इथलं गणित आहे. त्यामुळे मोहित पाटील येत्या विधानसभेच्या रणधुमाळीत कुटुंब ज्या बाजुने असेल त्या बाजुने राजकीय नेते पक्ष विचार करतात असं चित्र आहे. यातच रणजितसिंह मोहिते पाटील काँग्रेसमध्ये जाणार असल्याची चर्चा रंगल्याने सोलापूर जिल्ह्यात राजकारणात नवा ट्वीस्ट पाहायला मिळतो की काय अशी स्थिती आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img