परतीच्या पावसाने राज्यात गेल्या 2-3 दिवसांपासून अक्षरश: धुमाकुळ घातला आहे. (BMC) मंगळवारी (24 सप्टेंबर) रात्रीपासून सुरू झालेल्या परतीच्या पावसाने बुधवारी दिवसभर विश्रांती घेतल्यानंतर संध्याकाळ ते रात्रीपर्यंत अक्षरश: धुमाकूळ घातला. मध्य आणि पश्चिम रेल्वे त्यामुळे विस्कळीत झाली होती, तर अनेक रस्ते जलमय झाले होते. त्यामुळे नागिरकांना नाहक त्रास सहन करावा लागला होता. मुंबईत पाणी साचण्याची कारणे याचपार्श्वभूमीवर आता पालिका प्रशासनाने शोधण्याचा निर्णय घेतला आहे. (The municipal administration will find out the reasons for the water logging after Mumbais tumbai)
बुधवारी संध्याकाळी काही मिनिटांच्या विश्रांतीनंतर पावसाने पुन्हा एकदा जोर धरला. अनेक सखल भागांमध्ये त्यामुळे मुंबईतील पाणी साचण्यास सुरुवात झाली होती. अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली, बोरिवली,दहिसर, विलेपार्ले, सांताक्रुझ, वांद्रे या सर्व परिसरात मुसळधार पाऊस पडला. अंधेरीतील सबवे नेहमीप्रमाणे या पावसामुळे पाण्याखाली गेल्यामुळे रस्ते वाहतुकीवर याचा परिणाम झाल्याचे पाहायला मिळाले. मध्य रेल्वे 30 ते 40 मिनिटे उशिराने धावत होती, तर पश्चिम रेल्वेची वाहतूक 20 ते 30 मिनिटे उशिराने सुरू होती. त्यामुळे कामावरून घरी जाणाऱ्या कर्मचारी वर्गांचे मोठे हाल झालेत. याचपार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी गुरुवारी (26 सप्टेंबर) पत्रकार परिषद घेत पालिका प्रशासन, पालकमंत्री आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धारेवर धरले.
महायुतीत ट्विस्ट! अजितदादांना दिल्लीतून गुडन्यूज
BMC काय म्हणाले आदित्य ठाकरे?
आदित्य ठाकरे यांनी म्हटले की, मुसळधार पावसामुळे मुंबई ठप्प झाली तेव्हा आपातकालीन यंत्रणा कुठे होती? असा थेट सवाल त्यांनी केला. आदित्य ठाकरे म्हणाले की, मेट्रोची गर्दी, रेल्वेची गर्दी, वाहतूक कोंडी, मुंबईचं इतकं भयानक चित्र याआधी कधीही पाहिलं नव्हतं. आज मुंबई, ठाण्याकडे लक्ष देण्यासाठी कोणी नाही. आजुबाजूला जे गराडा घेऊन फिरतात तेच पोलीस बंदोबस्ताला लावले असते तर नागरिकांची गैरसोय झाली नसती. काही मिनिटांच्या पावसात मुंबई, ठाणे आणि पुणे या शहरांत लोकांचे हाल झाले. बीएमसीची यंत्रणा कुठे होती. दोन पालकमंत्री कुठे होते. मुख्यमंत्री यांनी काल म्हटले की, कुठे भरलंय का पाणी यंदा आणि दोन तासांत मुंबई तुंबली. बीएमसीत 15 वॉर्ड ऑफिसर नाहीयत. एवढी भयानक राजवट आजवर पाहिली नाही. काल रस्त्यावर अधिकारी दिसले नाहीत. पंप चालू नव्हते. 2005 नंतर पहिल्यांदा वेस्टर्न हायवे तुंबला, असा आरोपही त्यांनी केला.
BMC पालिका प्रशासन शोधणार पाणी साचण्याची कारणे
दरम्यान, मुंबईत पाणी तुंबल्यानंतर आता पालिका यंत्रणाही जागी झाली आहे. पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी शहरात पाणी साचल्यामुळे यंत्रणेवर नाराजी व्यक्त केली असून पाणी साचण्याची कारणे शोधण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच येत्या दोन ते तीन दिवसांत पर्जन्य जलवाहिन्या विभागातील अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाणी का साचले, पाण्याची पातळी किती होती याचा अभ्यास करून कारणे शोधावी, असे निर्देश अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले आहेत. याशिवाय पाणी साचण्याची काही नवीन ठिकाणे आढळली असतील, तर तेथे अशी परिस्थिती का उद्भवली याचाही अभ्यास करावा आणि त्यावर काय उपाययोजना करता येतील हे तपासावे, असेही निर्देशही बांगर यांनी दिलेत.