बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काऊंटर (Akshay Shinde Encounter) झाल्याप्रकरणी राजकीय वातावरण तापले आहे. तर दुसरीकडे अक्षयचा एन्काउंटर झाला नसून त्याची मुद्दामहून हत्या करण्यात आल्याचा आरोप त्याच्या कुटुंबियांनी केला आहे. याप्रकरणी अक्षयच्या वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. दरम्यान, अक्षय शिंदेच्या मृतदेहाचे शवविच्छेदन झाल्यानंतर त्याचा मृतदेह पुरण्याचा निर्णय त्याच्या कुटुंबीयांनी घेतला आहे. मात्र अक्षय शिंदेचा मृतदेह पुरण्यासाठी जमीन देण्यास स्थानिकांकडून विरोध होताना दिसत आहे. याचपार्श्वभूमीवर आज पार पडलेल्या सुनावणीवेळी मुंबई उच्च न्यायालयाने जागा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारला महत्त्वूपर्ण आदेश दिले आहेत. (Bombay High Court important order to state government regarding Akshay Shinde dead body)
मृत आरोपी अक्षय शिंदे याच्या वडिलांच्या वतीने वकील अमित कटारनवरे यांनी गेल्या सुनावणीवेळी न्यायालयाला माहिती दिली होती की, पुरावे नष्ट होऊ नये म्हणून अक्षय शिंदेचा मृतदेह पुरण्याचा निर्णय घेतला आहे. जेणेकरून भविष्यात काही पुरावे लागले तर मृतदेह पुन्हा बाहेर काढता येईल. परंतु मृतदेह पुरण्यासाठी जागा मिळत नाही. त्यामुळे आमच्या मुलाला न्याय मिळवून द्यायचा आहे, अशी कुटुंबाची भावना आहे.
महायुतीला अजित पवारांशिवाय पर्याय नाही, जयंत पाटलांचा खोचक टोला
राज्य सरकार आणि सरकारी वकीलांतर्फे न्यायालयाला आश्वासन देण्यात आले होते की, आम्ही स्थानिक प्रशासन म्हणजे पालिका प्रशासनाशी बोलून अक्षय शिंदेंच्या अंत्यविधीसाठी त्याच्या पालकाच्या इच्छेप्रमाणे जागा उपलब्ध करून देऊ, मात्र दोन दिवसांनंतरही प्रशासनाकडून अक्षय शिंदेचा मृतदेह पुरण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यात आली. यासंदर्भात आज पार पडलेल्या सुनावणीवेळी अक्षय शिंदेच्या वकिलांनी हा मुद्दा न्यायालयात उपस्थित केला. यावर उच्च न्यायालयाने सोमवारपर्यंत मृतदेह दफन करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानंतर आता अक्षय शिंदेचा मृतदेह दफन करण्यासाठी राज्य सरकार जागा उपलब्ध करून देणार आहे. राज्य सरकारच्या वकिलांनी याबाबत मुंबई उच्च न्यायालयात ग्वाही दिली आहे.
Akshay Shinde Encounter अक्षय शिंदेचा मृतदेह पुरण्यास विरोध
दरम्यान, अक्षय शिंदेच्या आई-वडील आणि त्याच्या नातेवाईकांनी मृतदेह पुरण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र मृतदेह पुरण्यास बदलापूरमधील नागरिकांनी विरोध केला आहे. याचपार्श्वभूमीवर अक्षय शिंदेच्या आई-वडिलांकडून त्याचा मृतदेह पुरण्यासाठी जागा शोधण्याचे काम सुरू आहे. ठाण्यात किंवा कळव्यात जागा शोधण्यात येत आहे. मात्र अक्षयचा मृतदेह या दोन्ही ठिकाणी पुरण्यासाठी मनसेने विरोध केला आहे. मनसेचे ठाणे शहर उपाध्यक्ष सुशांत सूर्यराव यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना पत्र लिहून म्हटले की, वृद्ध नागरिक आणि जनतेच्या विरोधा असून अक्षय शिंदेचा मृतदेह कळव्यात येणा नाही. तसेच अंबरनाथ पश्चिम येथील हिंदू स्मशानभूमीत अक्षय मृतदेह पुरण्याचा विचार केला जात आहे. मात्र त्या ठिकाणीही स्थानिकांनी विरोध केला आहे. त्यामुळे अक्षय शिंदेचा मृतदेह कुठे पुरायचा याबाबत अद्याप अंतिम जागा निश्चित झालेली नसून प्रशासनाकडून गुप्तता पाळली जात आहे.