21.7 C
New York

Devendra Fadnavis : मंत्रालयातील गृहमंत्री फडणवीसांच्या कार्यालयाची महिलेकडून तोडफोड

Published:

गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रालयातील कार्यालयाची एका अज्ञात महिलेने तोडफोड केल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. (Devendra Fadnavis ) प्राथमिक माहितीनुसार, संबंधित महिला पास न काढता मंत्रालयात शिरली. सचिवांसाठी असलेल्या गेटने महिलेने मंत्रालयात प्रवेश केला. या महिलेने फडणवीस यांच्या कार्यालयाची तोडफोड केली. त्यानंतर ही महिला इथून निघून गेली आहे. एकच खळबळ या घटनेचा व्हिडीओ समोर आल्यानंतरउडाली आहे. पोलिसांनी त्यामुळे या महिलेचा शोध आतासुरु केला आहे.

ही घटना घडल्यामुळे मंत्रालयाच्या सुरक्षा व्यवस्थेतील गंभीर त्रुटी समोर आल्या आहेत. ही महिला गुरुवारी रात्री मंत्रालयात शिरली. त्यावेळी मंत्रालयाच्या परिसरात फारसा पोलीस बंदोबस्त नव्हता. त्यामुळे ही महिला कोणाच्याही लक्षात न येता सचिवांच्या गेटने सहजपणे आतमध्ये शिरली. यानंतर ही महिला फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर केली आणि त्याठिकाणी तोडफोड केली अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.

केंद्राच्या 24 समित्या गठीत; राहुल गांधींना ‘ही’ जबाबदारी

Devendra Fadnavis ही महिला कोण होती?

ही महिला कोण होती? ते समजू शकलेलं नाही. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरु केला आहे. मंत्रालयातील उपमुख्यमंत्र्यांच कार्यालयच सुरक्षित नसल्याची चर्चा सुरु झाली आहे. या महिलेचा आता शोध सुरु झाला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाबाहेर आता पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. पुढच्या दोन महिन्यात महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका होणार आहेत. सध्या निवडणुकीच्या तयारीमध्ये, राजकीय कार्यक्रमांमध्ये देवेंद्र फडणवीस हे व्यस्त असतात. मंत्रालयात त्यांच्या कार्यालयात हा प्रकार घडला, त्यावेळी देवेंद्र फडणवीस तिथे उपस्थित होते की नाही? हे समजू शकलेलं नाही.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img