19.1 C
New York

Heavy Rain : अंधेरीत उघड्या नाल्यात पडून महिलेचा मृत्यू

Published:

मुंबईत बुधवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी तुंबले. (Heavy Rain) अंधेरीतील एमआयडीसीत मॅनहोलमध्ये बुडून ४५ वर्षाच्या महिलेचा मृत्यू झाला. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार विमल गायकवाड या महिलेचा उघड्या ड्रेनमध्ये पडून मृत्यू झाला. तिची मुंबई अग्नीशमन दलाकडून सुटका करण्यात आली. महिलेला कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, तिला डॉक्टरांनी तपासून मृत जाहीर केलं.

मुसळधार पावसामुळे चुन्नाभट्टी रेल्वे स्टेशनजवळील रेल्वे रुळावर पाणी साचल्यानं प्रवाशांना त्रासाला सामोरे जावे लागले. शहरातही वाहतुकीची कोंडी दिसून आली. मुसळधार पावसाचा काही प्रमाणात विमानसेवेला फटका बसला. दोन विमाने मुंबई विमानतळावरून इतरत्र वळविण्यात आली.

पुणे, पिंपरी चिंचवडमधील शाळांना सुट्टी; आज ‘या’ जिल्ह्यांना रेड अलर्ट

आज राज्यात अनेक ठिकाणी पावसाचा जोर कायम राहणार आहे. हवामान विभागाने मुंबई, पालघर जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी केला आहे. तसेच पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातही जोरदार पाऊस होईल असा अंदाज व्यक्त केला आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या दौऱ्याला पावसाचा फटका बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे. शहरातील एसपी कॉलेजच्या मैदानावर नियोजित सभा होणार आहे. मात्र कालपासून सुरू असलेल्या पावसामुळे मैदानावर चिखल झाला आहे. त्यामुळे गरज वाटल्यास कदाचित सभेचे ठिकाण बदलले जाऊ शकते.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img