10 C
New York

Heavy rain : मुंबई, पुण्यात 24 तासांत पुन्हा मुसळधार पावसाचा अंदाज

Published:

महाराष्ट्रात गेल्या 24 तासांत विक्रमी पाऊस (Heavy rain) झाला आहे. विक्रमी पावसाची नोंद मुंबई अन् पुण्यात झाली आहे. 200 मिमी पाऊस मुंबईत पाच तासांतच झाला आहे. पुण्यातही 125 मिमीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. मुंबई आणि ठाण्यात आज देखील काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. अजूनही मुंबईत कमी वेळेत अधिक पावसाची शक्यता आहे. बुधवारपेक्षा मात्र त्याची तीव्रता कमी असणार आहे.

Heavy rain मुंबईत 250 मिमी पाऊस

मुंबईतील अनेक भागात मागील 24 तासांत अतिवृष्टी झाली आहे. मुंबईतील काही ठिकाणी 250 मिमीहून अधिक पाऊस झाला आहे. पालघरमध्ये गुरुवारी काही भागात अतिवृष्टीची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. एक दोन ठिकाणी 200 मिमीहून अधिक पावसाचा अंदाज आहे. विजांच्या कडकडाटासह पाऊस बरसणार आहे.

Heavy rain पुण्यात पुन्हा ऑरेंज अलर्ट

पुण्यासाठी आज ऑरेंज अलर्ट दिला आहे. काही ठिकाणी विजांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज आहे. नाशिकसाठी आज रेड अलर्ट जारी केला आहे. वादळी वाऱ्यासह काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. मराठवाडा आणि विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडणार आहे. विदर्भात यलो अलर्ट जारी केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुण्यामध्ये पूर्वनियोजित दौरा

Heavy rain का सुरु आहे पाऊस

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्यामुळे राज्यात पाऊस पडत आहे. महाराष्ट्रासह कोकणात अजून पुढचे दोन दिवस पाऊस पडणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यासाठी पावसाचा आँरेज अलर्ट दिला आहे. शुक्रवारनंतर पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे. तळकोकणापासून रत्नागिरी जिल्ह्यापर्यत सर्वत्र पाऊस सुरु आहे. बुधवारी रात्रीपासून पावसाच्या जोरदार सरी पडत आहे. रत्नागिरी जिल्ह्यात आजपर्यत 104 टक्के पाऊस झाला आहे. आतापर्यत एकूण 3488 मिलिमिटर पावसाची नोंद झाली आहे.

Heavy rain उजनी धरणातून विसर्ग

उजनी धरणाच्या वरील साखळीमधील सर्व धरणे काठोकाठ भरली आहे. मोठ्या प्रमाणात पाऊस पुणे जिल्ह्याच्या पश्चिम घाटमाथ्यावर सुरू आहे. भीमा नदी पात्रात दौंड बंधाऱ्यातून मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक देखील होते आहे. यामुळे उजनी धरणातून भीमा नदी पात्रात 31 हजार 600 क्यसेक इतक्या दाबाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. उजनी धरणाचे 16 दरवाजे दोन फुटाने उचलण्यात आले आहेत. 109 टक्के सध्या उजनी धरण क्षमतेने भरले आहे. उजनीत 122 टीएमसी इतका पाणी साठा आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img