19.1 C
New York

Sanjay Raut : दोषी आढळल्यानंतर, संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया काय ?

Published:

मीरा भाईंदर परिसरात सार्वजनिक शौचालयाच्या बांधकाम आणि देखभालीशी संबंधित 100 कोटी रुपयांच्या घोटाळ्यात किरीट सोमय्या (Kirit Somaiya) आणि त्यांची पत्नी मेधा सोमय्या (Medha Somaiya) या सहभागी असल्याचा आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला होता. संजय राऊतांच्या या आरोपाविरोधात मेधा किरीट सोमय्या यांनी अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला होता. याप्रकरणी आता संजय राऊत दोषी आढळले असून त्यांना 15 दिवसांची कैद सुनावली आहे. याप्रकरणी आता संजय राऊत यांनी वरच्या न्यायालयात अपील करणार असल्याचे म्हटले आहे.

विधानसभेत भ्रष्टाचाराच्या विषयावर प्रश्न विचारले गेले. यासंदर्भात चौकशी होऊन गुन्हेगारांना शासन व्हायला पाहिजे, अशी मागणी झाली. त्यानंतर कायदेशीर कारवाई करण्याकरता विधानसभेने एक आदेश पारित केला होता. शासनाने यासंदर्भात चौकशी करून अभिप्राय लोकांसमोर आणावा, असे विधानसभेने म्हटले होते. यात मी अब्रुनुकसानी कुठे केली? पहिली अब्रुनुकसानी प्रवीण पाटील यांनी केली. दुसरी अब्रुनुकसानी मीरा-भाईंदरचा ज्यांनी अहवाल दिला आहे, त्यांनी केली. प्रताप सरनाईक जे आज भाजपासोबत आहेत, त्यांनी एक पत्र लिहून हाच आरोप करत अब्रुनुकसानी केली. राज्याच्या विधानसभेत चर्चा झाली तिथे अब्रुनुकसानी झाली. यानंतर राज्याच्या विधानसभेनेने एक आदेश देऊन अब्रुनुकसानी झाली. पण सार्वजनिक हितासाठी जनतेच्या पैशांचा अपहार झाल्याचे मला दिसले, म्हणून मी फक्त प्रश्न उपस्थित केला आणि आज मला शिक्षा ठोठावली आहे, अशी खंत संजय राऊत यांनी व्यक्त केली.

अब्रुनुकसानीच्या खटल्यात संजय राऊत दोषी, न्यायालयाने सुनावली शिक्षा

Sanjay Raut न्यायव्यवस्थेचं वरपासून खालपर्यंत संगीकरण झालंय

दरम्यान, न्यायालयाने मला 15 वर्षांची शिक्षा ठोठावली असती तरी मी सत्य बोलणं थांबवणार नाही. आम्ही वरच्या न्यायालयात अपील करत आहोत. तसेच खालच्या न्यायालयाने जो पुरावा मान्य केला नाही, तो आम्ही वरच्या न्यायालयात नेणार आहोत. कारण सार्वजनिक क्षेत्रामध्ये भ्रष्टाचार होत आहे, जनतेच्या पैशांचा अपहार होत आहे, त्यासंदर्भात आम्ही काही बोलायचं नाही. हे का होत आहे? असा प्रश्न उपस्थित करत राऊत म्हणाले की, याचं कारण संपूर्ण न्यायव्यवस्थेचं वरपासून खालपर्यंत संगीकरण झालेलं आहे. ज्या देशाचे सरन्यायाधीश गपपतीचे मोदक खायला प्रधानमंत्र्यांना बोलवतात आणि मोदीही जातात. त्या देशामध्ये आम्हाला काय न्याय मिळणार? असा प्रश्न उपस्थित करत संजय राऊत यांनी हल्लाबोल केला.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img