21.7 C
New York

Akshay Shinde Encounter : अक्षय शिंदेचा एन्काऊंटर करणारे संजय शिंदे कोण?

Published:

बदलापूर खासगी शाळेतील लैंगिक अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे (Akshay Shinde Encounter) .याचा सोमवारी (23 सप्टेंबर) रोजी अचानक पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत मृत्यू झाला. या घटनेनंतर अक्षय शिंदेवर गोळी झाडणारे मध्यवर्ती गुन्हे शाखा ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय शिंदे (Sanjay Shinde) यांच्या कारकीर्दीवर देखील सवाल उपस्थित करण्यात येत आहे.

संजय शिंदे यांची ठाणे गुन्हे शाखेच्या मध्यवर्ती युनिटमध्ये अक्षय शिंदेच्या (Akshay Shinde) एन्काऊंटरच्या 20 दिवसांआधीच बदली झाली होती. यापूर्वी संजय शिंदे यांना बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणाच्या तपासासाठी महाराष्ट्र सरकारने स्थापन केलेल्या एसआयटीमध्ये सामील होण्यासाठी विशेष शाखेत नियुक्त करण्यात आले होते. मात्र, कायदा आणि सुव्यवस्थेच्या चिंतेमुळे त्यांना पुन्हा आयुक्त कार्यालयात बोलावण्यात आले आणि त्यानंतर संजय शिंदे यांची नियुक्ती अक्षय शिंदेच्या पत्नीने दाखल केलेल्या आरोपाचा प्रकरणाचा तपास अधिकारी म्हणून करण्यात आली.

Akshay Shinde Encounter कोण आहे पोलीस निरीक्षक संजय शिंदे?

पोलीस निरीक्षक संजय शिंदे यांनी यापूर्वी माजी पोलिस अधिकारी आणि एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्यासोबत काम केले आहे. ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी कक्षात संजय शिंदे यांनी यापूर्वी काम केले आहे. तत्कालीन आयपीएस प्रदीप शर्मा त्याचे नेतृत्व करत होते. गँगस्टर दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर याला अटक करणाऱ्या टीममध्ये संजय शिंदे देखील होते. मुंबई पोलिसातही संजय शिंदे यांनी यापूर्वी काम केले आहे. राज्य सरकारने सध्या ते बदलापूर बलात्कार प्रकरणाच्या तपासासाठी स्थापन केलेल्या विशेष तपास पथकाचा (एसआयटी) भाग आहे.

Akshay Shinde Encounter 3 किमी, 2 मृत्यू, एक ठिकाण; मुंब्रा बायपास…

मुंब्रा बायपास वर ज्या ठिकाणी अक्षय शिंदेचा एन्काऊंटर झाला. त्यापासून तीन ते चार किलोमीटरच्या परिसरात मनसुख हिरेनला संपवण्यात आलं होतं, त्या घटनेमुळं चर्चेत आला होता. सीसीटीव्ही पाळत विशेष म्हणजे या संपूर्ण भागावर नाहीय. मार्च 2021 मध्ये मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटक ठेवल्याचं प्रकरण घडलं होतं. त्या प्रकरणात मनसूख हिरेन मुख्य साक्षीदार होता. दरम्यान, या मार्गावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे महत्त्वाचे आहे, कारण ते तपास आणि पुरावे गोळा करण्यात मदत करते. पोलीस अधिकाऱ्यांनी सरकारला एक प्रो पोस्टल आम्ही यासाठी आधीच पाठवले आहे, अशी माहिती दिली.

अमित शहांवर उद्धव ठाकरे यांचे जोरदार प्रत्युत्तर, म्हणाले

Akshay Shinde Encounter पोलीसांच्या गाडीत एन्काऊंटर-

तळोजा जेलमधून बदलापूर क्राईम ब्रान्चला बदलापूर प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या अक्षय शिंदेला पोलिस घेऊन जात होते, त्यावेळी हा प्रकार घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय शिंदेने पोलिस कॉन्स्टेबलची बंदूक हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. एपीआय निलेश मोरे यांना या झटापटीत लागली गोळी लागली. त्यानंतर एपीआय निलेश मोरे यांनी स्वसंरक्षणासाठी गोळी झाडली. यामध्ये अक्षय शिंदेचा मृत्यू झाला. सोमवारी (23 सप्टेंबर) सायंकाळी 6.30 च्या आसपास पोलिसांची टीम मुंब्रा बायपास जवळ आली. त्यावेळी ही घटना घडली. पोलिसांनीही स्वसंरक्षणासाठी अक्षय शिंदेवर तीन गोळ्या झाडल्या. पोलिसांच्या गोळीबारामुळं जखमी झालेल्या अक्षयला कळवा रुग्णालयात नेण्यात आलं. पणअक्षय शिंदेला डॉक्टरांनी मृत घोषित केलं.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img