21.7 C
New York

Uddhav Thackeray : अमित शहांवर उद्धव ठाकरे यांचे जोरदार प्रत्युत्तर, म्हणाले

Published:

आगामी विधानसभा निवडणूक नोव्हेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे. याचपार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोग या महिन्याच्या अखेरीस महाराष्ट्राचा दौरा करणार आहे. त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीसह सर्वच राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी मंगळवारी (24 सप्टेंबर) विदर्भ आणि मराठवाड्याचा दौरा केला. यावेळी त्यांनी भाजपा कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना आगामी विधानसभा निवडणुकीत पहिले टार्गेट हे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचे पक्ष असल्याचे म्हटले आहे. याप्रकरणी आता ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. (Uddhav Thackerays criticism of Amit Shah by calling it bazaarbunge)

भाजपाचे छत्रपती संभाजीनगरचे माजी सरचिटणीस दिनेश परदेशी यांनी आज उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. यानंतर माध्यमांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे म्हणाले की, गेल्या आठवड्यात दिनेश परदेशी हे आपल्याला भेटून गेले होते. भाजपमधून ते आपल्यासोबत आले आहेत. त्यामुळे मला भाजपाच्या कट्टर कार्यकर्त्यांना प्रश्न विचारायचा आहे की, तुमच्यामध्ये सुरू झालेला भेसळीचा कार्यक्रम तुम्हाला मान्य आहे का? कारण हिंदुत्वाच्या नावावर या लोकांनी थोतांड माजवलंय. पण माझं हिंदुत्व वेगळं आहे, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी अमित शहांवर निशाणा साधला.

अखेर नऊ दिवसांनंतर जरांगे पाटलांनी उपोषण सोडलं

उद्धव ठाकरे म्हणाले की, अमित शहा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांसोबत संवाद साधत आहेत. कालच महाराष्ट्राबाहेरचे बाजारबुणगे नागपूरमध्ये येऊन गेले आणि आम्हाला संपवण्याची भाषा करून केली. त्यांचं भाषण मी ऐकलेलं नाही. पण या बाजारबुणगेंना महाराष्ट्र टाचेखाली घ्यायचा आहे. त्यांना कल्पना नाही की, हा महाराष्ट्र वीरांचा आहे. आपल्याकडे बोलण्यासारखं खूप आहे, पण बाजारबुणगे असा शब्द मी जाणीवपूर्वक वापरतो. कारण उद्धव ठाकरेंना आणि शरद पवार यांना संपवण्याची भाषा ते करत आहेत. त्यांच्यात हिंमत असेल तर येऊन बघावे महाराष्ट्र कोणाला संपवतो, असा इशारा उद्धव ठाकरेंनी दिला.

Uddhav Thackeray काय म्हणाले होते अमित शहा?

दरम्यान, छत्रपती संभाजीनगरमधील संवाद बैठकीत बोलताना अमित शहा म्हणाले की, आगामी विधानसभा निवडणुकीत शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना यांना रोखणे हेच भाजपाचे लक्ष्य असणार आहे. त्या दिशेने कार्यकर्त्यांनी प्रयत्न करायचे आहेत. जिथे-जिथे विरोधकांची ताकद आहे, तिथे-तिथे त्यांच्या पक्षाचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते आपल्या पक्षात घ्या, अशा सूचना अमित शहांनी मराठवाडा आणि विदर्भातील बैठकीत केल्या आहेत. तसेच दुसऱ्या पक्षातून भाजपामध्ये आलेल्यांसोबत कुठलीही गटबाजी खपवून घेतली जाणार नाही, असा सज्जड दमही त्यांनी यावेळी दिला.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img