21.7 C
New York

Akshay Shindes encounter : अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरच्या तपासासाठी गृह मंत्रालय ॲक्शन मोडवर

Published:

मुख्य आरोपी अक्षय शिंदेने बदलापुरात घडलेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणातील स्वतःवर गोळी झाडल्याची माहिती आधी समोर आली होती. मात्र त्यानंतर त्याचा एन्काऊंटर झाल्याची बातमी समजली. पण हे सर्व संशयास्पद असल्याने विरोधकांकडून न्यायालयीन चौकशीची मागणी होत आहे. अशातच अक्षय शिंदेच्या एन्काऊंटर प्रकरणी तपासासाठी गृहमंत्र्यांच्या आदेशानंतर एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. (Home Ministry sets up SIT to probe Akshay Shindes encounter case main accused in Badlapur sexual assault case)

सोमवारी (23 सप्टेंबर) तळोजा कारागृहातून बदलापुरात घडलेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याला त्याच्या माजी पत्नीने नोंदवलेल्या आणखी एका गुन्ह्याच्या तपासासंदर्भात बदलापूरला नेले जात होते. यावेळी त्याने बाजूला बसलेल्या पोलिसाचे रिव्हॉलवर हिसकावून गोळी झाडली. याला प्रत्यत्तर देताना पोलिसांनी त्याच्यावर गोळी झाडली. यानंतर अक्षय शिंदेला उपचारासाठी कळव्यातील रुग्णालयात नेण्यात आले, मात्र त्याचा मृत्यू झाला. यानंतर विरोधी पक्षांनी एन्काऊंटर आश्चर्य व्यक्त करत या प्रकरणाची व्यापक आणि न्यायालयीन चौकशीची मागणी केली आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ आरोपीला गोळ्या झाडल्याचा दावा केला आहे. अशातच गृहमंत्रालयाकडून एन्काऊंटप्रकरणी एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे. एसआयटीचे प्रमुख गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त पंजाब राव उगले यांना करण्यात आले आहे. एसआयटीमध्ये एकूण 8 जणांचा समावेश आहे.

अक्षय शिंदेवर गोळी झाडणारा पोलीस अधिकारी कोण?

Akshay Shindes encounter ठाणे पोलिसांनी सांगितला घटनाक्रम

दरम्यान, ठाणे पोलिसांनी दिलेल्या निवेदनात म्हटले की, तळोजा जेलमधून ट्रान्झिट रिमांडसाठी अक्षय शिंदेला घेऊन जात होते. प्राथमिक माहिती नुसार संध्याकाळी सुमारे 05.30 वाजता अक्षय शिंदेला पोलीस पथकाने तळोजा मध्यवर्ती कारागृह येथून ताब्यात घेतले. अंदाजे संध्याकाळी 06 ते 6.15 च्या सुमारास त्यानंतर त्याला ठाणे इथे घेऊन जात असताना पोलीस वाहन मुंब्रा बायपास इथे आले. यावेळी आरोपी अक्षय शिंदेने पथकातील पोलीस अधिकारी निलेश मोरे यांच्याकडून बंदूक हिसकावून घेतली. त्याने पोलिसांच्या दिशेने 03 गोळ्या झाडल्या. त्यापैकी एक गोळी ही निलेश मोरे यांच्या डाव्या मांडीला लागली. त्यामुळे स्वसंरक्षणार्थ पोलीस दलातील आणखी एका अधिकाऱ्याने आरोपीवर गोळी झाडली, त्यात अक्षय शिंदे जखमी झाला. यानंतर निलेश मोरे आणि अक्षय शिंदे या दोघांना कळवा नागरी रुग्णालयात नेण्यात आले. यावेळी निलेश मोरे यांना डॉक्टरांनी ज्युपिटर रुग्णालयात पाठवले, तर अक्षय शिंदेला मृत घोषित केले. दरम्यान, पोलीस स्वसंरक्षणार्थ म्हणत असले तरी आरोपी अक्षय शिंदेच्या आई आणि काकांनी ही घटना एन्काउंटर असल्याचे सांगत न्यायाची मागणी केली.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img