13.2 C
New York

Sharad Pawar : मनोज जरांगेंच्या भूमिकेला शरद पवारांचा पाठिंबा

Published:

राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष उभा होत असल्याचं चित्र दिसत आहे. ओबीसींच्या आरक्षणासाठी लक्ष्मण हाके जालना जिल्ह्यात वडीगोद्री येथे उपोषण करत आहेत. (Sharad Pawar ) तर बाजूलाच आंतरवाली सराटी या गावात मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील सहाव्यांदा उपोषण करत आहेत. काहीसा तणाव दोन्ही नेत्यांचे समर्थक आक्रमक झाल्यामुळे पाहायला मिळत आहे. बीड, जालनासह काही जिल्ह्यांत जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठीबंद पाळण्यात आला आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही भाष्य केल आहे.

तणाव निर्माण होण्याचे काहीही कारण नाही. कारण आपला जात, धर्म वेगळा असला तरी आपण सर्व भारतीय आहोत. महाराष्ट्राचा आपण सर्व घटक आहोत. सर्व समाजात सामंज्यस्य कसं राहील, याबाबतची भूमिका या विषयात जे काम करत आहेत, त्यांनी घेतली पाहीजे. राज्य सरकारने सुद्धा अशा प्रश्नांवर निर्णय घेताना लोकांना सामील करून घेतलं पाहीजे. तसंच वातावरण चांगलं कसं राहिल, याचीही खबरदारी घेतली गेली पाहीजे.

शरद पवारांचा रस्त्याच्या कामावरून संताप

मनोज जरांगे पाटील यांच्या आमरन उपोषणाला शरद पवार यांनी पाठिंबा दिला आहे. ते म्हणाले छत्रपती शिवाजी महाराज हे सर्व जाती-धर्माला सोबत घेऊन चालणाले राजे होते. त्याच गोष्टीचा मराठा समाजाने आदर्श घेतलेला आहे. आज राज्यात मराठा समाज सर्वांना घेऊन चालतो. मनोज जरांगे यांची जी मागणी आहे ती योग्य आहे. त्यामध्य सर्वांचा विचार करण महत्वाचं असं शरद पवार म्हणाले आहेत. त्याचबरोबर आज राज्यात आरक्षणाबाबत जी काही परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यावर सरकारने तोडगा काढावा असंही ते म्हणाले आहेत.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img