बाजारात 10, 20 आणि 50 रुपयांच्या नोटाचा तुटवडा (Currency Shortage) जाणवत आहे. तक्रारी त्याविषयीच्या वाढल्या आहेत. काँग्रसेचे खासदार मणिकम टॅगोर यांनी याविषयी आवाज उठवला आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याकडे कमी मुल्याच्या नोटा बाजारातून अचानक गायब झाल्याची तक्रार त्यांनी केली आहे. त्यांनी याप्रकरणात भारतीय रिझर्व्ह बँकेवर गंभीर आरोप केला आहे. बँकेने या नोटांची छपाईच बंद केल्याचा आरोप केला आहे. देशात डिजिटल करन्सी आणि युपीआय पेमेंट वाढीसाठी असा प्रकार तर सुरू नाही ना? अशी शंका पण त्यांनी उपस्थित केली आहे. (Congress MP claims that there is a shortage of small denomination notes)
सरकारने डिजिटल व्यवहारांना चालना दिले पाहिजे, हे समजण्यासारखे आहे, परंतु त्यासाठी छोट्या नोटांवर बंदी घालणे हे कोणत्याही दृष्टीने अजिबात योग्य नाही. त्यामुळे दररोज नोटांच्या माध्यमातून किरकोळ व्यवहार करणाऱ्या लोकांना फटका बसत आहे. डिजिटल व्यवहार न करणाऱ्या तसेच ग्रामीण भागातील लोकांना यामुळे खूप अडचणींचा सामना करावा लागत असल्याचा दावा मणिकम टागोर यांनी अर्थमंत्र्यांना दिलेल्या पत्रात नमूद केले आहे. रोजंदारी मजूर आणि रस्त्यावरील विक्रेते हे रोख व्यवहारावर अवलंबून असताता. त्यामुळे छोट्या नोटा बाजारातून कमी झाल्या तर, त्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे, असे सांगून त्यांनी निर्मला सीतारामन यांच्याकडे तीन मागण्या केल्या आहेत. तर एक वर्षापूर्वी म्हणजे 2022-23 मध्ये आरबीआयने नोटा छपाईसाठी 4,682 कोटी रुपये खर्च केले होते.
पाकिस्तानी कलाकारांचे सिनेमे भारतात कशासाठी? राज ठाकरेंचा विरोध
Currency Shortage या नोटा न छापण्याचे कारण तरी काय?
मणिकम टॅगोर तामिळनाडू मधील विरुधुनगर मतदार संघाचे खासदार आहेत. त्यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांना पत्र लिहिले आहे. 10, 20 आणि 50 रुपयांच्या नोटांचा तुटवडा झाल्याने ज्येष्ठ नागरीक आणि ग्रामीण भागातील जनेतला मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मुद्दामहून नोटांचा तुटवडा करण्यात येत असल्याचा आरोप त्यांनी केला.