13.2 C
New York

Tirupati Tirumala Balaji : तिरुपती ‘लाडू’ प्रकरणात उपमुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय

Published:

zदेश विदेशातील कोट्यावधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या तिरुपती बालाजी मंदिरातील (Tirupati Tirumala Balaji) प्रसादावरून देशातील राजकारण तापलंय. खरंतर आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनीच (Chandrababu Naidu) या प्रसादाबाबत मोठा खुलासा केला होता. मंदिरात येणाऱ्या भाविकांसाठी आधीच्या वाएसआर काँग्रेस सरकारच्या काळात तयार करण्यात येणाऱ्या लाडूच्या प्रसादात (Laddu Prasad) जनावरांच्या चरबीचा वापर केला जात होता, असा अत्यंत धक्कादायक आरोप नायडू यांनी केला होता. त्यांच्या या आरोपात तथ्य असल्याचेही सिद्ध झाले. प्रसादाच्या लाडूंमध्ये प्राण्यांची चरबी असल्याचं समोर आलं. नॅशनल डेव्हलपमेंट बोर्डानेच हा खुलासा केला. या प्रकरणावर राजकारण अजूनही थांबलेलं नाही.

पवन कल्याण आंध्र प्रदेश राज्याचे उपमुख्यमंत्री (Pawan Kalyan) यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. हा जो प्रकार घडला आहे त्याचा मोठा धक्का पवनकल्याण यांना बसला आहे. त्यांनी मंदिरात 11 दिवसांची तपस्या सुरू केली आहे. वायएसआर काँग्रेसच्या पापांचे प्रायश्चित्त करण्यासाठी देवाकडे प्रार्थना करणार आहोत असे पवनकल्याण यांनी सांगितले. पवनकल्याण म्हणाले, गुंटूर जिल्ह्यातील नंबुरूत श्री दशावतार वेंकटेश्वर स्वामी मंदिरात आजपासून अनुष्ठानिक तपस्या सुरू करणार आहोत. अकरा दिवसांच्या तपस्येनंतर मी तिरुमला श्री व्यंकटेश्वर स्वामींचे दर्शन घेणार.

जागावाटपानंतर उमेदवार निश्चिती, शरद पवारांची स्पष्ट भूमिका

Tirupati Tirumala Balaji कसा तयार केला जातो प्रसाद

तिरुपती बालाजी मंदिरात तयार केला जाणारा लाडू प्रसाद खास पद्धतीने तयार केला जातो. याला दित्तम असेही म्हटले जाते. हा प्रसाद तयार करण्यासाठी बेसन, काजू, सुकामेवा, खडीसाखर, तूप, विलायची वापरतात. आतापर्यंत दित्तममध्ये फक्त सहा वेळा बदल करण्यात आले आहेत. दररोज प्रसाद तयार करण्यासाठी दहा टन बेसन, दहा टन साखर, 700 किलो काजू, 150 किलो विलायची, 300 ते 400 लीटर तूप, 500 किलो खडीसाखर, 540 किलो मनुके या पदार्थांचा वापर केला जातो. या पद्धतीने लाडू प्रसाद तयार करण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img