21.7 C
New York

Tirupati Tirumala Balaji : मोठी बातमी! तिरुपती लाडू वाद सुप्रीम कोर्टात

Published:

देश विदेशातील कोट्यावधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या तिरुपती बालाजी मंदिरातील (Tirupati Tirumala Balaji) प्रसादावरून देशातील राजकारण तापलंय. खरंतर आंध्र (Tirupati Laddu Row) प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनीच (Chandrababu Naidu) या प्रसादाबाबत मोठा खुलासा केला होता. आधीच्या वाएसआर काँग्रेस सरकारच्या काळात मंदिरात येणाऱ्या भाविकांसाठी तयार करण्यात येणाऱ्या लाडूच्या प्रसादात (Laddu Prasad) जनावरांच्या चरबीचा वापर केला जात होता, असा अत्यंत धक्कादायक आरोप नायडू यांनी केला होता. त्यांच्या या आरोपात तथ्य असल्याचेही सिद्ध झाले. प्रसादाच्या लाडूंमध्ये प्राण्यांची चरबी असल्याचं समोर आलं. नॅशनल डेव्हलपमेंट बोर्डानेच हा खुलासा केला. या प्रकरणावर राजकारण अजूनही थांबलेलं नाही. या प्रकरणात आता मोठी बातमी समोर आली आहे.

या प्रकरणी सु्प्रीम कोर्टात एक जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. तिरुपती प्रसाद लाडू प्रकरणाची सखोल चौकशीसाठी एसआयटी नियु्क्त करण्याची मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. या प्रकरणाची चौकशीसाठी हिंदू सेवा समिती नावाच्या संस्थेने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे आणि एसआयटी गठीत करण्याची मागणी केली आहे. हिंदू सेनेचे अध्यक्ष सुरजित सिंह यादव यांनी ही याचिका दाखल केली आहे. याआधी वकील सत्यम सिंह राजपूत यांनीही एक पत्र याचिका चीफ जस्टीस डीवाय चंद्रचूड यांना पाठवली होती.

Tirupati Tirumala Balaji नायडूंनी केला होता गंभीर आरोप

तिरुपती मंदिरातील (Tirupati Temple) लाडू वाद 18 सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी समोर आणला होता. नायडू यांनी एका अहवालाचा हवाला देत सांगितले होते की तिरुपती मंदिरातील प्रसादात वापरल्या जाणाऱ्या तुपात प्राण्यांची चरबी आहे. त्यांच्या या दाव्यानंतर देशभरात खळबळ उडाली होती. या प्रकरणात रोजच नवनवीन खुलासे होत आहेत. हा वाद सुप्रीम कोर्टात (Supreme Court) तर पोहोचला आहेच मात्र त्याआधी आंध्र प्रदेश (Andhra Pradesh High Court) उच्च न्यायालयातही याचिका दाखल झाली आहे. माजी मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी (Jagan Mohan Reddy) यांच्या वायएसआरसीपी पक्षातर्फे ही याचिका दाखल करण्यात आली आहे.

Tirupati Tirumala Balaji जगन रेड्डी यांच्या विरुद्धही तक्रार

या याचिकेत असाही आरोप करण्यात आला आहे की चंद्राबाबू नायडू चुकीचे आरोप करून जगन मोहन रेड्डी यांची जनमानसातील प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न करत आहेत. तर दुसरीकडे तिरुमला प्रसादममध्ये वापरल्या जाणाऱ्या तुपात भेसळीच्या आरोपांनंतर माजी मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी आणि अन्य काही जणांविरुद्ध हैदराबादेत तक्रार दाखल करण्यात आली आहे. मंदिराला अपवित्र करण्याचे दुर्दैवी कृत्य आणि सनातनी हिंदू धार्मिक भावनांना धक्का लावण्याचा आरोप जगन मोहन रेड्डी यांच्यावर करण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img