10 C
New York

Vanchit Bahujan Aaghadi : विधानसभेसाठी ‘वंचित’ ची पहिली यादी जाहीर

Published:

आगामी काळात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांसाठी राजकीय वातावरण तापण्यास सुरूवात झालेली असून, (Vanchit Bahujan Aaghadi) महायुती आणि महाविकास आघडीत जागा वाटपांची चर्चा अद्याप सुरू झालेली नाही. या सर्व घडामोडींमध्ये प्रकाश आंबेडकरांनी आघाडी घेता आगामी विधानसभेसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यात 11 जणांच्या नावाचा समावेश असून, केवळ दोन बुद्धिस्टांनाच यात स्थान देण्यात आले आहे. रावेरमधून वंचितने तृतीयपंथी शमिभा पाटील यांना उमेदवारी दिली असून, शमिभा पाटील या लेवा पाटील समाजातील आहेत.

Vanchit Bahujan Aaghadi कुणा-कुणाला मिळाली संधी?

– रावेर – शमिभा पाटील
– शिंदखेड राजा – सविता मुंढे
– वाशिम – मेघा किरण डोंगरे
– धामणगाव रेल्वे – निलेश विश्वकर्मा
– नागपूर दक्षिण मध्य – विनय भागणे
– साकोली – डॉ. अविनाश नान्हे
– नांदेड दक्षिण- फारुख अहमद
– लोहा – शिवा नारांगले
– औरंगाबाद पूर्व- विकास रावसाहेब दांडगे
– शेवगाव – किसन चव्हाण
– खानापूर – संग्राम कृष्णा माने

Vanchit Bahujan Aaghadi रावेर मतदारसंघातून तृतीयपंथी उमेदवार रिंगणात

वंचितने जाहीर केलेल्या पहिल्या यादीत रावेर मतदारसंघातून तृतीयपंथी उमेदवार रिंगणात उतरवलं आहे. शमिभा पाटील असे वंचितच्या रावेर मतदारसंघातून लढणाऱ्या उमेदवाराचे नाव आहे. शमिभा भानुदास पाटील या एक मराठी पारलिंगी सामाजिक कार्यकर्त्या असून, तृतीयपंथी हक्क अधिकार समितीच्या राज्य समन्वयक संस्थापक आहेत. त्या 2019 पासून वंचित बहुजन आघाडी सोबत सक्रिय असून काम करत आहेत. शमिभा पाटील या लेवा पाटील समाजातील आहेत.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img