19.1 C
New York

Manoj Jarange : मनोज जरांगेंच्या उपोषणाला पाठिंब्यासाठी आज धाराशिव, बीड बंद; संघटना आक्रमक

Published:

मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा राज्यात (Maratha Reservation) चर्चेत आला आहे. पुन्हा (Manoj Jarange) उपोषण मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केले आहे. त्यांच्या उपोषणाला राज्यभरातून पाठिंबा वाढू लागला आहे. मागील पाच दिवसांपासून त्यांचं उपोषण सुरू आहे. शुक्रवारी त्यांची तब्बेत खालावली होती. या घडामोडी घडत असताना आता राज्यातील मराठा संघटना आक्रमक झाल्या आहेत. धाराशिव, बीड जिल्ह्यांतआज बंद (Beed News) पुकारण्यात आला आहे. जिल्ह्यातील बाजारपेठा, शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवावीत असे आवाहन करण्यात आले आहे.

Manoj Jarange देसाईंच्या विनंतीनंतर जरांगेंनी घेतले उपचार

धाराशिव, बीड जिल्ह्यांत मनोज जरांगे यांच्या आमरण उपोषणाचा आजचा पाचवा दिवस आहे. कालपासूनच जरांगे यांची प्रकृती खालावली होती. यानंतर मोठ्या प्रमाणात लोकांनी त्यांना उपचार घेण्याची विनंती केली होती. मनोज जरांगे यांना त्यानंतर मंत्री शंभूराज देसाई यांनी देखील फोन करुन उपचार घेण्याची केली विनंती केली होती. जरांगे यांनी उपचार घेतले आहेत. मनोज जरांगे यांना मध्यरात्री पावणेदोन वाजता डॉक्टरांकडून सलाईन लावण्यात आले. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा पाचवा दिवस आहे.

Manoj Jarange ओबीसी अन् मराठा कार्यकर्त्यांत वाद

दरम्यान, रात्री उशिरा वडीगोद्री येथे उपोषणाला बसलेल्या ओबीसी कार्यकर्ते आणि आंतरवाली सराटीतील मराठा कार्यकर्त्यांत वाद झाला होता. त्यामुळे येथे काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती. जालन्यातली वडीगोद्री येथे ओबीसी समाजाचे उपोषण सुरू आहे. या ठिकाणाहून तीन किलोमीटर अंतरावरच मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू आहे.

Manoj Jarange काय आहेत मागण्या

सगेसोयरेच्या अधिसूचनेची अंमलबजावणी करावी. हैदराबाद गॅझेट लागू करावे. सातारा गॅझेट लागू करावे. बॉम्बे गव्हर्नमेंट गॅझेट लागू करावे. मराठा बांधवांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे सरसकट मागे घ्यावेत अशा मागण्या मनोज जरांगे पाटील यांनी केल्या आहेत. आज शनिवार उपोषणाचा पाचवा दिवस आहे. सरकार पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. अद्याप ठोस निर्णय झालेला नाही.

दरम्यान, जरांगे पाटील यांना उपोषणाच्या चौथ्या दिवशी चालणं देखील मुश्कील झालं होतं. सहकाऱ्यांचा आधार घेत ते चालताना दिसत होते. मनोज जरांगे यांना थकवा जाणवतोय. खाली ते स्टेजवरून उतरताना अचानक खाली बसलेले पाहायला मिळाले. यावेळी त्यांना उठता येत नव्हते. सरकारकडून मनोज जरांगेंना कोणता प्रतिसाद मिळतोय का? याकडं सर्वांचं लक्ष आहे. आजवर मराठा समाजाने सहकार्याचीच भूमिका घेतली आहे. एक वर्षापासून लढा सुरू आहे. लाखोंची जनता रस्त्यावर उतरल्याचे पाहून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना याचं वाईट वाटायला पाहिजे, अशी प्रतिक्रिया म्हणून जरांगे यांनी दिली होती. मनोज जरांगेंचे सध्या सहावे उपोषण सुरू आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img