देश विदेशातील कोट्यावधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या तिरुपती बालाजी मंदिरातील (Tirupati Tirumala Balaji) प्रसादावरून देशातील राजकारण तापलंय. खरंतर आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनीच (Chandrababu Naidu) या प्रसादाबाबत मोठा खुलासा केला होता. मंदिरात येणाऱ्या भाविकांसाठी आधीच्या वाएसआर काँग्रेस सरकारच्या काळात तयार करण्यात येणाऱ्या लाडूच्या प्रसादात (Laddu Prasad) जनावरांच्या चरबीचा वापर केला जात होता, असा अत्यंत धक्कादायक आरोप नायडू यांनी केला होता. त्यांच्या या आरोपात तथ्य असल्याचेही सिद्ध झाले. प्रसादाच्या लाडूंमध्ये प्राण्यांची चरबी असल्याचं समोर आलं. नॅशनल डेव्हलपमेंट बोर्डानेच हा खुलासा केला. आज याच निमित्ताने मंदिरात तयार होणाऱ्या एका लाडूची किंमत किती असते याची माहिती घेऊ या..
Tirupati Tirumala Balaji कसा तयार केला जातो प्रसाद
तिरुपती बालाजी मंदिरात तयार केला जाणारा लाडू प्रसाद खास पद्धतीने तयार केला जातो. याला दित्तम असेही म्हटले जाते. हा प्रसाद तयार करण्यासाठी बेसन, काजू, सुकामेवा, खडीसाखर, तूप, विलायची वापरतात. दित्तममध्ये फक्त सहा वेळा आतापर्यंत बदल करण्यात आले आहेत. दररोज प्रसाद तयार करण्यासाठी दहा टन बेसन, दहा टन साखर, 700 किलो काजू, 150 किलो विलायची, 300 ते 400 लीटर तूप, 500 किलो खडीसाखर, 540 किलो मनुके या पदार्थांचा वापर केला जातो. या पद्धतीने लाडू प्रसाद तयार करण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे.
मशिदीचा अवैध भाग तोडण्यावरून वाद चिघळला; धारावीत तणावपूर्ण स्थिती
Tirupati Tirumala Balaji किती असते एका लाडूची किंमत
तिरुमला मंदिरात तीन प्रकारचे लाडू मिळतात. 40 ग्रॅम वजनाचे छोटे लाडू मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना मोफत दिले जातात. 175 ग्रॅम वजनाच्या मध्यम आकाराच्या एका लाडूची किंमत 50 रुपये आहे. तर 750 ग्रॅम वजनाच्या एका लाडूची किंमत 200 रुपये आहे. येथे काही विशेष लाडूही तयार केले जातात जे पंधरा दिवसांपर्यंत ताजे राहतात. या प्रसाद लाडूंना खास पॅकेजिंग तंत्रज्ञानाच्या मदतीने पॅक केले जाते. अॅटोमॅटिक यंत्रांच्या मदतीने लाडू पॅक केले जातात. यासाठी प्रति पॅकेट 0.50 पैसे इतका खर्च येतो.
Tirupati Tirumala Balaji दर्शन न घेताच प्रसाद मिळतो का
बालाजी मंदिराजवळच तिरुमला वेस्ट माडा रोडवर टीटीडी लाडू काउंटर आहे. येथे लाडूसाठी पैसे देऊन तुम्ही लाडू घेऊ शकता. दर्शन न घेताच प्रसादाचे लाडू मिळतात का. तुम्ही तिरुमलात टीटीडी लाडू काउंटरवरून पैसे देऊन लाडू खरेदी करू शकता. मध्यम आकाराची लाडूची किंमत 50 रुपये तर मोठ्या आकाराच्या लाडूची किंमत 200 रुपये आहे.
Tirupati Tirumala Balaji प्रसादातून किती होते कमाई
देशातील आघाडीच्या आठ मंदिरांत तिरुपती बालाजी मंदिर सर्वात श्रीमंत आहे. तिरुपती ट्रस्टच्या उत्पन्नात मोठा हिस्सा प्रसादातून मिळतो. प्रसादाच्या माध्यमातून 400 ते 600 कोटी रुपये ट्रस्टजवळ येतात. या व्यतिरिक्त 338 कोटी रुपयांचे उत्पन्न दर्शन तिकीटातून मिळतात.