10 C
New York

RBI : आरबीआयचा IIFL फायनान्सला मोठा दिलासा

Published:

बँकिंग क्षेत्रातील नियामक रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) (IIFL)फायनान्सला मोठा दिलासा दिला आहे. आरबीआयने (IIFLFinance)च्या गोल्ड लोन व्यवसायावरील बंदी मागं घेतली आहे. स्टॉक एक्स्चेंजकडं नियामक फाइलिंगमध्ये कंपनीने ही माहिती दिली आहे.

IIFL फायनान्सने स्टॉक एक्स्चेंजकडे नियामक फाइलिंगमध्ये म्हटलं आहे की, भारतीय रिझर्व्ह बँकेने (दि. 19 सप्टेंबर 2024) रोजी IIFL फायनान्स लिमिटेडच्या गोल्ड लोन व्यवसायावरील बंदी उठवण्यात आली आहे. 4 मार्च 2024 रोजी, आरबीआयने IIFL फायनान्सला गोल्ड लोन मंजूर करण्यावर, वितरण किंवा विक्री करण्यावर बंदी घातली होती.

कंपनीने एक्सचेंजला सांगितले की आरबीआयचा हा निर्णय ताबडतोब लागू झाला आहे. नियमांनुसार, गोल्ड लोन कंपनीला मंजूर करणं, वितरण, असाइनमेंट, सिक्युरिटायझेशन आणि सोन्याच्या कर्जाची विक्री करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

RBI आरबीआयने बंदी का घातली होती?

4 मार्च 2024 रोजी, भारतीय रिझर्व्ह बँकेने IIFL फायनान्सला गोल्ड लोन मंजूर आणि वितरणावर बंदी घातली होती. विद्यमान गोल्ड लोन पोर्टफोलिओ कंपनीला सुरू ठेवून संकलन आणि वसुली प्रक्रिया सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली. आरबीआयला सोन्याची शुद्धता आणि वजन यामध्ये आयआयएफएलच्या गोल्ड लोन पोर्टफोलिओमध्ये कर्ज मंजूर करताना गंभीर अनियमितता आढळून आली होती.

iPhone 16 खरेदीसाठी मुंबईतील स्टोरबाहेर लांबच लांब रांग

RBI शेअर्समध्ये मोठी घसरण

आरबीआयला कर्जाच्या गुणोत्तरामध्येही तफावत आढळून आली होती. त्यानंतर कंपनीवर ही कारवाई करण्यात आली होती. आरबीआयने बंदी घातल्यानंतर आयआयएफएलच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली होती. आता आरबीआयने बंदी मागे घेतल्यानंतर पुन्हा कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img