19.1 C
New York

Mahayuti : महायुतीमध्ये 80 टक्के जागा वाटप फायनल !

Published:

विधानसभा निवडणुकीसाठी (Maharashtra Assembly Election 2024) महायुती आणि महाविकास आघाडीकडून जोरदार तयारी सुरू आहे. दोन्ही आघाड्यांमध्ये जागा वाटपाबाबत चर्चा सुरू आहेत. त्यात आता महायुतीने महाविकास आघाडीचे मागे टाकले आहे. महायुतीमध्ये 80 टक्के जागा वाटप निश्चित झाले आहे. महायुतीमध्ये आमदारांच्या संख्येने भाजप सर्वात मोठा पक्ष आहे. त्यामुळे भाजपला (BJP) सर्वाधिक जागा मिळतील हे आता निश्चित झाले आहे. भाजपला 160 हून अधिक जागा मिळू शकतात. गुरुवारी तिन्ही पक्षांमध्ये जागा वाटपाबाबत एक महत्त्वपूर्ण बैठक झाली. त्यात बैठकीत काही जागांवर अंतिम निर्णय झाला आहे. तर सर्व जागा वाटपांबाबत शुक्रवारीही चर्चा होणार आहे.”

महाविकास आघाडीमध्ये काही मातब्बर नेते आहेत. ते तिथून सातत्याने आमदार म्हणून निवडून येतात. त्या ठिकाणी मागील निवडणुकीत दोन नंबर मते घेतलेल्या पक्षाला जागा द्यायची असे ठरले जात आहेत. त्या जागा कुणाला कशा द्यायच्या यावर चर्चा सुरू आहे. भाजपचे हायकमांड व गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) हे पुढील आठवड्यात राज्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात जागा वाटपाबाबत अंतिम चर्चा केली जाणार आहे. तसेच तिन्ही पक्ष हे संभाव्य उमेदवारांची यादी तयार करत आहेत. दरम्यान महाविकास आघाडीची जागा वाटपाबाबत उद्या शुक्रवारी बैठक होणार आहे.

Mahayuti  भाजपला गेल्या इतक्याच जागा हव्यात


शिवसेना-भाजप युती असताना 2019 मध्ये भाजपने 164 जागा लढविल्या होत्या. यावेळी देखील तितक्याच जागा भाजपला हव्या आहेत. भाजपचे शंभरहून अधिक आमदार आहेत. भाजपने 164 जागा लढल्यास. उर्वरित जागा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या पक्षाला दिल्या जातील.पण लोकसभेच्या स्ट्राइकनुसार शिवसेनेकडून अधिक जागा मागितल्या जात आहेत.

Mahayuti  विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी कधी ?


विधानसभा निवडणुकीची घोषणा जम्मू-काश्मीर आणि हरियाणाची निवडणूक झाल्यानंतर होणार आहे. त्यानुसार ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात निवडणूक जाहीर होईल. विधानसभेची मुदत ही 28 नोव्हेंबर संपत आहे. त्यामुळे राज्यातील निवडणूक ही 10 ते 20 नोव्हेंबर या कालावधीत होऊ शकते. त्यामुळे लवकरच जागा वाटप करून उमेदवार निश्चित केले जाऊ शकते.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img