19.1 C
New York

Kirti College : कीर्ती महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी स्वीकारले आगळे वेगळे चॅलेंज

Published:

आजकाल सर्वच सोशल मीडियावर व्यस्त आहेत. युवकांना तर सोशल मीडिया शिवाय काही सुचत नाही. कोणतीही गोष्ट असो ती सोशल मीडियावरच व्यक्त केली जाते परंतु कीर्ती महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक याला अपवाद ठरले. जेव्हा आजकाल युवक युवती सोशल मीडियावर वेगवेगळे चॅलेंज एक्सेप्ट करतात तेव्हा कीर्ती महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी एक आगळावेगळा चॅलेंज स्वीकारलं. गेल्या काही वर्षांपासून कीर्ती महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक कीर्ती जागर ह्या उपक्रमाच्या माध्यमातून गणेशोत्सवात १०१ गणपती मंडळांमध्ये सामाजिक विषयांवर पथनाट्य करतात.

सध्याची परिस्थिती पाहता आणि स्त्रियांवरचे अत्याचार आणि बलात्कार ज्या प्रमाणात वाढत आहेत त्यावर प्रबोधन व्हावं म्हणून स्वयंसेवकांनी ‘थांबवू स्त्री अत्याचार’ हे पथनाट्य यावर्षी सादर करण्याचे ठरवलं आणि त्याची जनजागृती जास्तीत जास्त लोकांमध्ये व्हावी यासाठी त्यांनी १५१ पपथनाट्य करण्याचा पन केला त्यासाठी नम्रता जोहरे, श्रवण लांबे, साहिल शिंदे, साई हडवले, श्रीकांत रेनुसे, वेनीला कदम आणि जय राजगुरू ह्यांच्या नेतृत्वात चार ग्रुप विविध मंडळांमध्ये पथनाट्य सादर करून समाजात समानता पसरवण्याच कार्य करत होते . लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव स्वातंत्र्याच्या आधी समाज प्रबोधन करण्याच्या उद्देशानेच सुरू केलेला स्वातंत्र्यपूर्व काळात सर्वांना एकत्र आणायची जशी गरज होती, तशीच गरज आता स्त्री पुरुष समानतेवर प्रबोधन करण्याची आहे .

दबंग आयपीएस शिवदीप लांडे यांचा तडकाफडकी राजीनामा

म्हणूनच लोकमान्य टिळकांच्या या वैचारिक परंपरेला पुढे नेण्याच काम कीर्ती महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी केलं आणि १५१ गणपती मंडळांमध्ये १५१ पथनाट्य सादर करून घेतलेला प्रण पूर्ण केला. ह्या उपक्रमात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मिलिंद जोग तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी अंकुश दळवी, प्रतिभा बिस्वास आणि पूजा कांबळे यांचे विशेष मार्गदर्शन मिळाले . आणि त्यासोबत भरत चौधरी सुदर्शन जाधव आणि श्रुती फुलपगार ह्या माजी विद्यार्थ्यांनीही सहकार्य केले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img