19.1 C
New York

Bigg Boss Marathi : घरात अरबाज आणि निक्कीमध्ये होणार का राडा?

Published:

‘बिग बॉस मराठी’च्या आजचा (Bigg Boss Marathi) भाग खूपच रंजक असणार आहे. या आठवड्याची थीम ‘जंगलराज’ अशी आहे. सोमवारच्या भागात या थीमनुसार घरातील सदस्यांना ‘शिकाऱ्याची बंदूक’ हा नॉमिनेशन टास्क देण्यात आला होता. (Captaincy Task) आता आजच्या भागात घरात कोणाला अंड्याचा फंडा समजणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या समोर आलेल्या प्रोमोमध्ये, (Bigg Boss Marathi Promo)’कॅप्टन पदाची उमेदवारी मिळवण्यासाठी दुसऱ्या सदस्यांच्या घरट्यात अंड ठेऊन बाद करायचे आहे’, असं म्हटलं जात आहे. अरबाज (Arbaz Patel ) पुढे म्हणतोय,’पहिल्या फेरीत अरबाज आणि अभिजीतला काढू’. पुढे अरबाज आणि निक्कीमध्ये (Nikki Tamboli) जोरदार राडा झालेला प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या आजच्या भागात कॅप्टनसी टास्क पार पडणार आहे. या आठवड्यात घराला कॅप्टन नव्हता. पण आता या टास्कमध्ये कोण विजयी होत कॅप्टन होणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

Bigg Boss Marathi पॅडी भाऊंनी सांगितली त्यांची ‘ही’ खास इच्छा

पॅडी भाऊ म्हणाले,”मी नेहमी एक इच्छा प्रकट करतो. पण ती इच्छा प्रकट केल्यानंतर मी फक्त घरी बसून नाही राहात. ती इच्छा पूर्ण करण्यासाठी मी खूप मेहनत करून काम करतो. मला एकदा एका नाटकाची ऑफर आली होती आणि त्या नाटकाचे पाकीट जेवढे मी सांगितले तेवढे मला मिळत नव्हते. जर मी काम केले तर मनाने करीन नाहीतर करणार नाही असा माझा स्वभाव आहे. मग त्या नाटकाचे माझे जमले नाही. त्या दरम्यान मी एक इच्छा प्रकट केली होती की मला गाडी घ्यायची आहे.

पुढे पॅडी म्हणाले, एके दिवशी मला फोन आला आणि मला एक शो ऑफर झाला. मी त्यांना प्रत्येक एपिसोडचा एक आकडा सांगितला पण ते म्हणाले की, येवढे नाही जमणार आपण एका दिवसात तीन एपिसोड करतो. नंतर दोन दिवसानंतर त्याचा परत फोन आला ते म्हणाले, आपण दोन एपिसोड झाले की तुमचे दिवसाचे पैसे तुम्हाला देऊ. मी विचार केला तर मला समजले की, माझे पैसे मला वाढवूनच मिळणार आहेत तर मी हो सांगितले. मी नंतर काम करायला लागलो आणि माझे सगळे पैसे खर्च करून एक शिल्लक रक्कम माझ्याकडे राहात होती आणि माझ्या डोक्यात गाडीचा विचार सतत सुरूच होता. तेव्हा मी पैसे दिले आणि गाडी घेतली. पुढे पॅडी म्हणाले, तुम्हाला सांगायचा मुद्दा हा की, तुम्ही सातत्याने आणि चिकाटीने काम करत राहिलात तर ती गोष्ट पूर्ण होतेच. प्रामाणिक पणाने कोणाचे वाईट कधी चिंतू नये.”

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img