19.1 C
New York

Varsha Gaikwad : महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळणार? वर्षा गायकवाडांचे मोठे विधान

Published:

राज्य विधानसभा निवडणकीचे वारे वाहू लागले आहेत. महायुती आणि महाविकास आघीडतील जागावाटपाटच्या चर्चा अद्यापही सुरू आहेत. पण राज्यात सध्या महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदाच्या चेहरा कोण असेल, हा चर्चेचा विषय़ ठरत आहे. रोज कोणत्या ना कोणत्या नेत्याचे नाव समोर येत आहे. आरोप-प्रत्यारोप, दावे प्रतिदावेही सुरू आहेत.

अशातच एका काँग्रेस खासदाराने मोठे विधान केले आहे. महाराष्ट्राच्या महिला मुख्यमंत्रीपदासाठी शरद पवार यांच्या पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांचे नाव समोर आले आहे. दुसरीकडे आतापर्यत राज्याला महिला मुख्यमंत्री कधी मिळणार, अशाही चर्चा अनेकदा होत असतात. राज्याच्या विधानसभा निवड़णुका तोंडावर आलेल्या असताना महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्रीपदाचा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. त्यातच काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांच्या विधानाने राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना सुरूवात झाली आहे.

राष्ट्रवादीचे आमदार नवाब मलिकांचे जावई आणि मुलीच्या गाडीचा अपघात

खासदार वर्षा गायकवाड यांनी एका वृत्तवाहिनीशी संवाद साधला. यावेळी महाराष्ट्रात महाविकास आघाडीची सत्ता आल्यास महिला मुख्यमंंत्री होऊ शकते का? असा प्रश्न वर्षा गायकवाड यांना विचारला असता वर्षा गायकवाड म्हणाल्या, ‘महाविकास आघाडीतील सर्व पक्षांकडे मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सक्षमपणे सांभाळणाऱ्या महिला आहेत. शरदचंद्र पवार यांच्या पक्षाकडे, सुप्रिया सुळे तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे रश्मी ठाकरे आहेत.आमच्या पक्षाकडेही महिला नेक्या आहेत. पण त्याबाबतचा निर्णय निवडून आलेले आमदार घेतात.

महाराष्ट्राची पुरोगामी आणि प्रगत राज्य म्हणून ओळख आहे. महाविकास आघाडीपैकी कुठल्याही पक्षाची महिला मुख्यमंत्री झाली तरीही मला आनंदच होईल. महिलांना खूप संघर्ष करावा लागतो. आमच्यासमोर इंदिरा गांधींचा आदर्श आहे. सोनिया गांधींनाही आम्ही संघर्ष करताना पाहिलं आहे. पण भाजपकडे बघा, भाजपमद्ये महिलांना मंत्रिपदही दिले जात नाही. पक्षाचे अध्यक्षपद दिले जात नाही.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img