19.1 C
New York

Ganesh Visarjan : गणेशोत्सव होताच मिसेस उपमुख्यमंत्री लागल्या स्वच्छतेच्या कामाला

Published:

10 दिवसांच्या सेवेनंतर गणपती बाप्पांना अनंत चतुर्दशी दिवशी निरोप देण्यात आला. (Ganesh Visarjan) मात्र या गणेशोत्सवादरम्यान अर्धवट विसर्जित झालेल्या मूर्त्या किनार्‍यावर येतात. हार फुलांचा कचरा समुद्राचं सौंदर्य खराब करतात. मुंबईमध्ये वर्सोवा बीचवर देखील यामधूनच खास स्वच्छता अभियान राबवण्यात आलं होतं. हाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis), आयुष्मान खुराना, (Ayushmann Khurrana) निरंजन हिरानंदानी यांनी यामध्ये सहभाग घेत बीच स्वच्छ केला आहे. दरम्यान त्यांच्यासोबत अनेक शाळकरी मुलं देखील सहभागी होती.

Ganesh Visarjan ‘पानी दा रंग’ या गाण्याने तयार झालेले वातावरण

एएनआय या वृत्तसंस्थेने आयुष्मान खुरानाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो समुद्रकिनारा साफ करताना दिसत आहे. साफसफाईच्या कामानंतर अभिनेत्याने आपल्या सुरेल आवाजाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. ‘पानी दा रंग’ हे गाणे गाऊन त्यांनी लोकांचा दिवस केला. गणपती विसर्जन कार्यक्रमानंतर या स्वच्छता मोहिमेत आयुष्मान खुरानासोबत इतर अनेक सेलिब्रिटीही दिसले.

रश्मी ठाकरेंच्या मुख्यमंत्री पदाला ठाकरेंच्या वाघीणीचाच ‘खो’; नाव न घेण्याचे कारणही दिले

Ganesh Visarjan तरुणांना प्रेरणा दिली

या स्वच्छता मोहिमेचे आयोजन वर्सोवा समुद्रकिनारी लोकांमध्ये पर्यावरण रक्षणाबाबत जबाबदारीची भावना निर्माण व्हावी, जेणेकरून त्यांना सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ ठेवण्याचे महत्त्व समजावे. यावेळी आयुष्मान खुराना यांनीही लोकांना त्यांच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवण्याबाबत जागरूक केले, विशेषत: तरुणांना प्रेरणा दिली. ते म्हणाले, ‘तुम्ही सर्वजण येथे उपस्थित आहात याचा मला खूप आनंद झाला आहे. उद्याचे नेतृत्व तुमच्या हातात असेल. आमचे भविष्य तुमच्या हातात आहे.

Ganesh Visarjan मेघना गुलजारच्या चित्रपटात दिसणार

आयुष्मान खुराना पुढे म्हणाला, ‘आज असे वाटते की आपला भारत जागा झाला आहे. आपल्याकडे राहण्यासाठी फक्त एकच ग्रह आहे. आपण पृथ्वीशिवाय जगू शकत नाही, परंतु पृथ्वी मानवांशिवाय जगू शकते. आयुष्मान खुरानाच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर तो मेघना गुलजारच्या ‘डायरा’ या चित्रपटात दिसणार आहे. यामध्ये तो करीना कपूरसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img