19.1 C
New York

RBI : कर्जावरील ईएमआय कम होण्याची शक्यता, RBI गव्हरर्नचे संकेत?

Published:

कर्जावरील ईएमआय कम होण्याची भविष्यवाणी भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर (RBI) शक्तिकांत दास यांनी केली आहे. याचा सरळ अर्थ असा आहे की, आरबीआय रेपो दरात कपात करणार. परिणामी कर्जावरील हप्ता कमी होणार. रेपो दर गेल्या दीड वर्षांहून अधिक काळापासून जैसे थे आहे. त्यात कोणताच बदल झालेला नाही. अमेरिकन फेडरल रिझर्व्ह बँकेचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांनी आणि युरोपियन केंद्रीय बँकेने सुद्धा व्याजदर कपातीचे संकेत दिले आहेत. आता आरबीआय भारतातील परिस्थितीनुसार काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

RBI पतधोरण समितीची बैठक

7 ते 9 ऑक्टोबर दरम्यान भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची बैठक होत आहे. रेपो दरात कपातीचा निर्णय होण्याची या बैठकीत दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. शासकीय धोरणांचा आढावा अर्थात त्यासाठी महागाईचे आकडे, जागतिक घडामोडी, कच्चा तेलाचे भाव आणिघेण्यात येईल. त्यानंतर याविषयीचा निर्णय होईल. ऑगस्ट महिन्यात पतधोरण आढाव्यात अन्नधान्याचा आलेख उंचावल्याचे समोर आले होते. त्याआधारे नवव्यांदा रेपो दर 6.5 टक्के असा कायम ठेवण्यात आला.

RBI निवडणुकीचा वाजला बिगुल

जम्मु-काश्मिर, हरियाणामध्ये निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. तर महाराष्ट्रासह इतर राज्यात पण निवडणुकीची नांदी आहे. कच्चा तेलाचा भाव सर्वात निच्चांकी पातळीवर सध्या पोहचले आहे. दोन वर्षांपासून रशिया-युक्रेन युद्ध सुरू आहे. त्यात भारत शांतीदूत म्हणून भूमिका निभावण्याची शक्यता आहे. इस्त्रायल विविध आघाड्यावर युद्ध लढत आहे. या सर्व घडामोडी पाहता आणि महागाईचे आकडे पाहता, यावेळी भारतीय रिझर्व्ह बँक गेल्या दीड वर्षातील राबता मोडण्याची शक्यता अधिक आहे. धाडसी निर्णय घेण्याची शक्यता आरबीआय बळावली आहे.

RBI काय म्हणाले शक्तिकांत दास?

महागाई आणि विकासाचा दर कसा आहे यावर सगळं अवलंबून असेल. पतधोरण समितीची ऑक्टोबर महिन्यात बैठक होत आहे. या बैठकीत निर्णय होईल. आताच त्याविषयी मी आताच काही सांगू शकत नाही. पण पतधोरण समितीच्या बैठकीत चर्चेअंती निर्णय घेऊ. विकासाच्या मापदंडावर भारताची घौडदौड सुरू आहे. महागाई बाबतीत मासिक काय आकडेवारी आहे, त्याचा विचार करावा लागेल, असे मत आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी मांडले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img