19.1 C
New York

Ganpati Visarjan : लाडक्या बाप्पाला आज निरोप दिला जाणार; गणपती विसर्जनासाठी प्रशासन सज्ज

Published:

10 दिवस मनोभावे सेवा केल्यानंतर आता आज लाडक्या बाप्पाला निरोप (Ganpati Visarjan) दिला जाणार आहे. ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या…’ अशाच भावना प्रत्येक गणेशभक्ताच्या मनात आहेत. लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी यंत्रणा सज्ज आहे. लालबागचा राजा आणि तेजूकायाचा मंडळाकडून बाप्पाची उत्तर पूजा पार पडली आहे. काही वेळात ढोल ताशाच्या गजरात बाप्पाच्या मिरवणुकीला सुरुवात होणार आहे. विसर्जन मिरवणुकीला काही वेळात सुरवात होणार आहे. सकाळी 8. 30 वाजता विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होईल. तेजूकाया बापाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाल्यावर मुंबईतील इतर गणपती विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होईल.

Ganpati Visarjan गिरगाव चौपाटीवर सुरक्षाबल तैनात

मुंबईच्या गिरगाव चौपाटी समुद्रकिनाऱ्यावर विसर्जनाची तयारी करण्यात आली आहे. अकरा दिवसानंतर गणरायाच्या विसर्जनासाठी मुंबईच्या गिरगाव चौपाटीवर पोलीस आणि महानगरपालिकेकडून तयारी करण्यात आली आहे. मनपा आणि पोलिसांकडून नियंत्रण कक्ष बनवण्यात आले आहेत. थोड्याच वेळात छोट्या गणेशाच्या विसर्जनाला सुरुवात होणार आहे. मुंबईतील सर्वात मोठे गणेश मूर्ती गिरगाव चौपाटीवर विसर्जित होतात. लालबागचा राजा, मुंबईचा राजा आणि चिंचपोकळीचा चिंतामणी हे गिरगाव चौपाटीवर विसर्जित होतात. गिरगाव चौपाटीवर मोठ्या प्रमाणात गर्दी होते, म्हणून त्याठिकाणी सुरक्षाबल तैनात करण्यात आले आहेत.

‘मुंबईचा राजा’ म्हणून प्रसिद्ध असलेला गणेश गल्लीच्या गणपती बाप्पाची उत्तरपूजा आज सकाळी ८ वाजता सुरू होणार आहे. पण त्यापूर्वी गणेश गल्लीच्या बाप्पाच्या मंडपात भाविक आणि मंडळाच्या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. उत्तरपूजा संपन्न झाल्यावर 8.30 वाजता मुंबईचा राजाची विसर्जन मिरवणुकीला सुरवात होणार आहे. आज मुंबईच्या रस्त्यावर लाखोंची गर्दी आपल्या बाप्पाची एक झलक पाहण्यासाठी येणार आहे. त्यासाठी मुंबई महापालिका आणि मुंबई पोलीस सज्ज आहे.

Ganpati Visarjan पुण्यात थोड्याच वेळाच मिरवणुकीला सुरुवात

पुण्यात थोड्याच वेळात विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होणार आहे. मानाचा पहिला कसबा गणपती मिरवणुकीसाठी निघणार आहे. रथ सजवून तयार करण्यात आला आहे. थोड्याच वेळात मिरवणुकीला सुरुवात होणार आहे. दगडूशेठ हलवाई गणपतीची मूर्ती मंदिरात स्थापन करण्यात आली आहे. 4 वाजता मिरवणूक निघणार आहे. त्या आधी मंडपातून गणपती मंदिरात आणण्यात आला आहे.

आज लाडक्या गणरायाला निरोप दिला जाणार आहे. नांदेडमध्ये 2 हजार 900 पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 3 कृत्रिम तलाव, 26 मूर्ती संकलन केंद्र तयार करण्यात आली आहेत. लाडक्या गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी भक्तांसह नांदेड जिल्हा प्रशासन सज्ज आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img