10 C
New York

Sassoon Hospital : ससून रुग्णालयात चार कोटी १८ लाख रुपयांचा अपहार, २५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Published:

सतत वादात असणाऱ्या ससून रुग्णालयातील (Sassoon Hospital) आणखी एक घोटाळा झाला उघड झाला. ससूनच्या कर्मचाऱ्यांनीच चार कोटी १८ लाख ६२ हजार रुपयांचा अपहार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली. या प्रकरणी ससून रुग्णालयाचे अकाउंटंट अनिल माने (Anil Mane)आणि रोखपाल सुलक्षणा चाबुकस्वार (Sulakshana Chabukswar) यांच्यासह अन्य २३ सरकारी आणि खासगी कर्मचाऱ्यांविरुद्द बंडगार्डान पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

ड्रग्ज प्रकरणात मोठ्या गुन्हेगारांना पाठीशी घालण्यावरून तसेच पोर्शे अपघात प्रकरणात रक्ताचे नमुने बदलण्यावरून ससून हॉस्पिटलला चर्चेत आलं होतं. आता ससूनमध्ये मोठा आर्थिक गैरव्यवहार झाला. ससूनमध्ये कर्मचाऱ्यांनीच चार कोटी १८ लाख ६२ हजार रुपयांचा अपहार केला. याप्रकरणी ससूनचे प्रशासकीय अधिकारी गोरोबा आवटे यांनी फिर्याद दिली आहे.

ससून रुग्णालयाच्या शासकीय नोंदवहीत आर्थिक तफावत असल्याची बाब समोर आली होती. या संदर्भात चौकशी समिती नेमण्यात आली. असून वैद्यकीय संचालनालयाच्या स्तरावर चौकशी करण्यात आली. माने आणि चाबूकस्वार यांना सह्यांचे अधिकार दिले होते. त्याचा गैरवापर करून अधिष्ठाता यांची मान्यता नसतांना अकाऊंटंट आणि रोखपाल यांनी ससूनच्या बँक खात्यातून स्वत:च्या आणि इतर कर्मचाऱ्यांच्या खात्यात 4 कोटी 18 लाख 62 हजार रुपये जमा केले. तसेच आर्थिक अपहार करून फसवणूक केल्याचं फिर्यादीत म्हटलं.

Sassoon Hospital यल्लपा यांच्यावर कार्यवाही नाही…

दरम्यान, अधीक्षक हे पद प्राध्यापकांसाठी असतानाही सहप्राध्यापक यलप्पा जाधव या ठिकाणी बसले कसे? त्यांच्या पदावरही सामाजिक कार्यकर्ते दादा गायकवाड यांनी आक्षेप घेतला होता आणि दहा दिवस उपोषण केलं होतं. यल्लाप्पा जाधव यांच्यावर कारवाई करू, असं आश्वासन डिन एकनाथ पवार यांनी देऊन एक महिना होऊन गेला तरीही अधीक्षक यलप्पा जाधव यांच्यावर कुठलीही कारवाई डीन पवार यांनी केली नाही…

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img