आज जगभरात आंतरराष्ट्रीय लोकशाही दिन साजरा केला (International Day of Democracy) जात आहे. सन 2007 मध्ये संयुक्त राष्ट्र महासभेद्वारा आंतरराष्ट्रीय लोकशाही दिवसाची सुरुवात करण्यात आली होती. सर्वात आधी 2008 मध्ये लोकशाही दिवस साजरा करण्यात आला होता. जगात प्रत्येक ठिकाणी सुशासन स्थापित करणे हा या मागचा उद्देश आहे. भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही देश (Indian Democracy) म्हणून ओळखला जातो. आज याच लोकशाही दिनाच्या निमित्ताने काही खास गोष्टी जाणून घेऊ या..
International Day of Democracy इतिहास
आंतरराष्ट्रीय लोकशाही दिन एका प्रस्तावाच्या माध्यमातून सुरू करण्यात आला होता. संयुक्त राष्ट्र महासभेच्या (United Nations) माध्यमातून 8 नोव्हेंबर 2007 मध्ये हा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. पुढे हा प्रस्ताव मंजूर करण्यात येऊन हा दिवस सर्वत्र साजरा करण्यात येऊ लागला. लोकशाही अधिक मजबूत करणे करण्याच्या उद्देशाने हा प्रस्ताव सादर करण्यात आला होता.
International Day of Democracy लोकशाही दिनाचे महत्व
आंतरराष्ट्रीय लोकशाही दिन सर्व नागरिक आणि सरकारांना मानवाधिकराचा सन्मान करणे आणि लोकशाहीत आपले योगदान देण्याचा आग्रह धरतो. जगात काय समस्या आहेत याबाबत माहिती देणे तसेच जगभरातील या समस्यांवर मार्ग काढण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती मजबूत करण्यासाठी हा दिवस दरवर्षी 15 सप्टेंबर रोजी साजरा करण्यात येतो.
आंतरराष्ट्रीय लोकशाही दिन (International Democracy Day) विविध संस्था विविध पद्धतीने साजरा करतात. लोकांमध्ये लोकशाहीबाबत जागृती घडवून आणणे हा मुख्य उद्देश यामागे आहे. या दिवशी ठिकठिकाणी चर्चासत्र, वाद विवाद कार्यक्रम आणि संमेलन यांसारखे कार्यक्रम आयोजित केले जातात. समाजात नेहमीच मानवाधिकार आणि कायद्यांच्या नव्या नियमांचे रक्षण केले जाते असे संयु्क्त राष्ट्रसंघाचे मत आहे.