21.7 C
New York

Uddhav Thackeray : तो पुसून काढण्याची वेळ आली, उद्धव ठाकरेंचा शिंदेंवर हल्लाबोल

Published:

विधानसभा निवडणुका जाहीर होण्यापूर्वी आज राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे छत्रपती संभाजीनगर (Sambhajinagar) दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांनी वैजापूरला (Vaijapur) सभा घेतली. या सभेत बोलताना त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर जोरदार हल्लाबोल करत लोकसभा निवडणुकीत गद्दारांमुळे पराभव झाला आणि हा पराभव शिवसेनाला लागलेला कलंक आहे. तो पुसून काढण्याची वेळ आली आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत गद्दारांना जागा दाखवा, असं शिवसंवाद मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले.

शिवसंवाद मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत संभाजीनगर लोकसभा मतदार संघात आपण हरलो त्याची रुखरुख मला अजूनही आहे. आपला पराभव गद्दारांमुळे झाला. लोकसभेत लोकांनी धनुष्यबाणाला मतदान केले कारण त्यांना वाटले धनुष्यबाण असलेली हीच शिवसेना खरी शिवसेना आहे. कारण त्यांनी बाळासाहेबांचे नावही चोरले होते. त्यामुळे धनुष्यबाण आणि बाळासाहेबांचे नाव पाहून ते मतदान झाले मात्र आता घराघरात मशाल पोहचवा आणि विधानसभा निवडणुकीत त्यांना त्यांची जागा दाखवा असे यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले.

या सरकारला खड्यासारखे बाजूला काढा,शरद पवार यांचा महायुती सरकारवर हल्ला

पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, महायुती सरकार शेतकऱ्यांना हक्काचे देत नाही भीक देत आहेत. पीक विम्याचे पैसे मिळत नाही. त्यामुळे आता त्यांना चाले जावं म्हण्याची वेळ आली आहे. असं देखील या मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले. तसेच यावेळी 1500 रुपयांत घर चालते का? कोणत्या बहिणीला विचारला असं म्हणत लाडकी बहीण योजनेवर देखील टीका केली. तसेच महायुतीचे सरकार आता फक्त दोन महिन्यांचे सरकार आहे. आमचे सरकार आल्यावर आम्ही जुनी पेन्शन योजना लागू करणार आहे. तोपर्यंत शेवटच्या कॅबिनेटमध्ये या सरकारने जुनी पेन्शन योजनेचा निर्णय घेतला तर त्यांना पाठिंबा देऊ नका असा आवाहन देखील यावेळी उद्धव ठाकरेंनी केला आहे.

तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) सरन्यायाधीशांच्या घरी गेले होते त्यावेळी सरन्यायाधीशांनी गणपतीला पुढची तारीख दिली नाही, हे महत्वाचे आहे. माझे न्यायदेवतेवर विश्वास आहे पण उशिरा मिळालेल्या न्यायास न्याय म्हणता येईल का? त्यामुळे आता जनतेच्या न्यायालयात त्यांचा निकाल लागणार असेही शिवसंवाद मेळाव्यात वैजापूर येथे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img