बिग बॉस मराठी : बिग बॉस मराठी (Big Boss Marathi) सध्या चांगल्या टीआरपीसह महाराष्ट्रातील प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. मागील आठवड्यामध्ये स्पर्धकांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले. यावेळी अनेक भांडण आणि स्पर्धकांमध्ये राडा पाहायला मिळाला. कॅप्टन्सी टास्कमध्ये यावेळी निक्की तांबोळी आणि रॅपर आर्या यांच्यामध्ये कडाक्याचे भांडण पाहायला मिळाले. यावेळी आर्याकडून बिग बॉस मराठीच्या घरामधील सर्वात मोठ्या नियमांचे उल्लंघन करण्यात आले. घरामध्ये निक्कीवर आर्याने हात उचलण्याची घटना घडली आहे. घराने या घटनेला यामुळे संपूर्ण विरोध केला आहे. भाऊंचा धक्का एपिसोड आता आज म्हणजेच शनिवारच्या भागामध्ये होणार आहे, यासंदर्भात एक प्रोमो यामध्ये रितेश देशमुख काय निर्णय घेणार प्रदर्शित झाला आहे, यावर एकदा नजर टाका.
आर्याने निक्कीला कानशिलात मारल्यानंतर तिला बिग बॉसने जेलमध्ये बंद केले होते. यासंदर्भात प्रदर्शित झालेल्या प्रोमोमध्ये रितेशने आर्याला भाऊंच्या धक्क्यावर बोलावलं आणि म्हणाला की, तुम्ही स्वतःला काय समजत आहेत. तुम्हाला राग आला तर तुम्ही कोणावरही हात उचलणार का? तुम्ही जे केलं आहे ते १००% इंटेशनल होत. यावर बिग बॉस यावर निर्णय देणार आहेत असे रितेश देशमुख म्हणाला. आता यावर रितेश काय निर्णय देतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. यावर प्रेक्षकांचा पाठींबा आर्याच्या घटनेशी आहे. याआधी बिग बॉस मराठी २ च्या सीझनमध्ये अशा प्रकारचे कृत घडले होते त्यावेळी सुद्धा स्पर्धकाला बाहेर काढण्यात आले होते.
बिग बॉसच्या घरामध्ये या आठवड्यामध्ये निक्की तांबोळी, वैभव चव्हाण, अंकिता वालावलकर, वर्षा उसगावकर, अभिजित सावंत, आर्या जाधव हे सदस्य घरांमधून बाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झाले आहेत. यासाठी बिग बॉसच्या प्रेक्षकांनी भरभरून वोट केले आहेत. या घरात एकूण १६ स्पर्धकांनी यंदा सहभाग घेतला होता. यापैकी पुरुषोत्तमदादा पाटील, निखिल दामले, योगिता चव्हाण, इरिना, आणि घन:श्याम दरवडे या स्पर्धकांनी आतापर्यंत या घराचा निरोप घेतला. उरलेल्या स्पर्धकांमध्ये चुरशीची लढत सुरु आहे.