13.2 C
New York

Jawhar : समाज माध्यमांवर सायबर सेलची नजर; चुकीच्या पोस्ट टाकणाऱ्यांवर होणार कारवाई

Published:

जव्हार: जव्हार (Jawhar) उपविभागातील जव्हार, मोखाडा, वाडा, विक्रमगड व कासा पोलीस स्थानक हद्दीत सण-उत्सवाच्या काळात माध्यमांचा गैरवापर करणाऱ्यांवर, अफवा पसरवणाऱ्यांवर सायबर सेल लक्ष ठेवून असल्याचे जव्हार येथील उपविभागीय पोलीस अधिकारी गणपतराव पिंगळे यांनी सांगितले आहे.त्यामुळे कोणत्याही नागरिकांनी समाज माध्यमांवर चुकीच्या पोस्ट करू नये असे आवाहन पालघर पोलीस विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.


दरम्यान, गणेशोत्सव आणि ईद-ए-मिलाद हे दोन्ही सण यावर्षी एकाच कालावधीत आले आहेत. जव्हार उपविभागात हे दोन्ही सण साजरे करताना सर्व धर्मीयांनी परस्पर सौहार्द व शांततेला गालबोट लागणार नाही याची काळजी घेऊन एकोप्याने व आनंदाने सण साजरे करावेत, जेणे करून सामजिक सलोखा अबाधित राहील.

‘खडसे भाजपमध्ये आल्यास फडाके फोडून स्वागत करू’; गिरीश महाजनांचे मोठे विधान


उत्सवांचे या काळात सर्व धर्मीयांकडून विविध सांस्कृतिक कार्यक्रम, देखावे, वेगवेगळ्या प्रतिकृती, वेगवेगळ्या सणांच्या मिरवणुका सुरू आहेत. त्या संदर्भातील माहिती प्रसिद्ध करताना काळजी घ्यावी. सोशलमीडियाचा वापर काळजीपूर्वक करावा. सामाजिक जाणिवांचे भान ठेवावे. समाज माध्यमांचा गैरवापर करणाऱ्यांवर सक्त कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे समाज माध्यमांचा योग्य प्रकारे सर्वांनी वापर करावा. शिवाय, नागरिकांनी समाज माध्यमांवर येणाऱ्या कोणत्याही पोस्टबद्दल प्रतिक्रिया देताना शांततेने प्रतिक्रिया व्यक्त करावी. पोलिसांची मदत घ्यावी. काही समाजकंटक अशा वेळी जुन्या पोस्ट टाकून लोकांची दिशाभूल करतात. अफवा पसरवितात, टीका करतात. त्यामुळे जनतेने सावध राहावे असे आवाहन पोलिस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

जव्हार उपविभागातील पोलीस स्थानक हद्दीतील शहर व गावांना सर्वधर्मीयांच्या सामंजस्याचा चांगला इतिहास आहे. त्यामुळे कोणतीही चुकीची पोस्ट समाज माध्यमांवर आल्यावर त्याबाबत जवळच्या पोलिस स्टेशनला माहिती द्यावी असे आवाहन पालघर जिल्हा पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी केले आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img