सोमवारी 16 सप्टेंबर रोजी मिळणारी ईद-ए-मिलादची (Eid-e-Milad-Un-Nabi 2024) सुट्टी रद्द करण्यात आली आहे. ईद-ए-मिलाद हा मुस्लीम धर्मीयांसाठी महत्त्वाचा सण आहे. यावेळी जुलूस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. मात्र यंदा 17 सप्टेंबर मंगळवारी अनंत चतुर्दशी असल्याने रस्त्यांवर मोठी गर्दी जमा होते. त्यामुळे दोन्ही समाजामध्ये शांतता आणि सामाजिक सलोखा कायम राहण्याकरिता या सुट्टीत बदल करण्यात आले आहेत.
Eid Milad ईद-मिलाद-ऊन-नबी का आहे मुस्लिमांसाठी महत्त्वाचे
इस्लामिक कॅलेंडरमध्ये ईद-मिलाद-ऊन-नबी हा दिवस पैंगबर मुहम्मद यांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. याच दिवशी अल्लाने पैंगबर यांना पृथ्वीवर पाठवलं होतं असं मानलं जातं. इस्लामिक कॅलेंडरच्या तिसऱ्या महिन्यात रबी-उल-अवलमध्ये साजरा केला जाणारा हा उत्सव आहे. याला ईद सारखंच पवित्र मानलं जातं. इस्लाममध्ये हा देखील अत्यंत महत्त्वाचा सण आहे.
१७ सप्टेंबर म्हणजे मंगळवारी अनंत चतुर्दशी आहे. लाडक्या बाप्पाचे या दिवशी विसर्जन केले जाणार आहे. या दिवशी मोठ्या प्रमाणात सार्वजनिक आणि घरगुती गणपतींचे विसर्जन केले जाते. मोठ्या प्रमाणात लोक रस्त्यावर उतरलेले असतात. त्यामुळे वाद निर्माण होऊ नये आणि सामाजिक सलोखा कामय राहावा यासाठी ईद मिलादच्या शासकीय सुट्टीत बदल करण्यात आला आहे.
Eid Milad याचिका नाकारली
ईद मिलाद उन – नबी निमित्त राज्यात अनेक ठिकाणी काढण्यात येणाऱ्या मिरवणुकीत डीजे आणि प्रखर दिव्यांच्या (लेझर बीम) वापरावर बंदीची मागणी करणारी जनहित याचिका तातडीने ऐकण्यास उच्च न्यायालयाने मंगळवारी नकार दिला. ईद – ए – मिलाद पुढील आठवड्यात सोमवारी साजरा होणार आहे. त्यामुळे, या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्याची मागणी याचिकाकर्त्यांतर्फे न्यायालयाकडे करण्यात आली.