10 C
New York

Maratha Reservation : विधानसभेपूर्वी सावध पवित्रा; मराठा आरक्षणावर मोठा निर्णय होण्याची शक्यता

Published:

लोकसभेत मराठवाड्यातील ९ पैकी केवळ १ जागा महायुतीला मिळाली. (Maratha Reservation ) महायुतीला मराठा आरक्षणाचा मोठा फटका मराठवाड्यात बसला. भाजप मराठवाड्यात शून्यावर आला. पंकजा मुंडे, रावसाहेब दानवे यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांचा पराभव झाला. मनोज जरांगे पाटील आताही मराठा आरक्षणाची धग कायम असून त्यासाठी यांचं आंदोलन सुरु आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत. त्यासाठीच्या हालचाली प्रशासकीय पातळीवर सुरु झालेल्या आहेत.

मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी हैदराबाद गॅझेट लागू करण्याची तयारी महायुती सरकारकडून सुरु असल्याचं वृत्त एबीपी माझानं दिलं आहे. मुख्यमंत्री ऍक्शन मोडवर हैदराबाद गॅझेट लागू करण्यासाठी काम करत आहेत. महायुती सरकार हैदराबाद गॅझेट विधानसभा निवडणुकीच्या आधी लागू करण्याचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. यासाठी २५ ते ३० सप्टेंबर दरम्यान विधिमंडळाचं एकदिवसीय अधिवेशन घेतलं जाण्याची दाट शक्यता आहे.

हैदराबाद गॅझेटच्या अभ्यासासाठी जुलैमध्ये राज्य सरकारचं एक शिष्टमंडळ तेलंगणाला गेलं होतं. हैदराबाद गॅझेटचा अभ्यास करुन, आवश्यक कागदपत्रं प्राप्त केली. हैदराबाद गॅझेटच्या आधारे मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी मनोज जरांगे पाटील यांनी लावून धरली आहे. त्यासाठी त्यांनी गेल्या अनेक महिन्यांपासून आग्रही भूमिका घेतली आहे. महायुती सरकारचा तोच मुद्दा निकालात काढण्याचा प्रयत्न आहे.

‘हा’ फडणवीसचा शब्द, राज्यपालपदावरून एकनाथ खडसेंचा गौप्यस्फोट

Maratha Reservation जरांगे-पाटलांची मागणी काय?

१८८१ मध्ये ब्रिटिशांनी केलेल्या जनगणनेत मराठवाड्यातील बहुतांश मराठा समाज कुणबी होता. तशा नोंदी करण्यात आल्या होत्या. मात्र त्यानंतरच्या जनगणनेत नोंदी बदलण्यात आल्या. १८८१ च्या आधारे मराठवाड्यातील मराठा समाजाला आणि सातारा संस्थांच्या नोंदी तपासून पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाजाला कुणबी दाखले द्यावेत, अशी जरांगे पाटलांची मागणी आहे.

मराठवाड्यात लोकसभेच्या ९ जागा आहेत. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत यापैकी केवळ १ जागा महायुतीला मिळाली. भाजपला मराठवाड्यात भोपळा मिळाला. मराठवाड्यात महायुतीला मविआनं ९ पैकी ८ जागा जिंकत दणका दिला आहे. विधानसभेलाही जरांगे फॅक्टर मराठा आंदोलनाचा जोर कायम असल्यानं महागात पडण्याची शक्यता आहे. विधानसभेच्या ४६ जागा मराठवाड्यात आहेत. भाजप-शिवसेना युतीनं गेल्या विधानसभा निवडणुकीत यातील २८ जागा जिंकल्या होत्या.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img