21.7 C
New York

Bigg Boss Marathi : आर्याच्या चुकीचा होणार पंचनामा, बिग बॉस देणार मोठी शिक्षा?

Published:

‘बिग बॉस मराठी’च्या घरात (Bigg Boss Marathi) नुकताच पार पडलेल्या कॅप्टनसी टास्कने (Captaincy Task) सर्वांनाच मोठा धक्का दिलाय. कॅप्टनसी टास्कदरम्यान आर्याने (Aarya Jadhav) निक्कीच्या (Nikki Tamboli ) कानशिलात लगावल्याने बिग बॉस तिला काय शिक्षा देणार याकडे प्रेक्षकांचं आता लक्ष लागलं आहे. कॅप्टनसी पदाच्या (Bigg Boss Marathi) टास्कदरम्यान जादुई हिरा मिळवण्याची धडपड करताना हा प्रकार घडला आहे.

या नव्या पर्वानेही अक्षरशः धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे. नव्या पर्वात आर्या आणि निक्की अनेकदा एकमेकांसोबत वाद घालताना दिसून आल्या आहेत. पण आज त्यांच्या वादाने उच्चांक गाठला आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या घरात आज कॅप्टन्सीचा टास्क पार पडणार आहे. या टास्कदरम्यान आर्या व निक्कीमध्ये जोरदार खडाजंगी झाली आणि नंतर आर्याने निक्कीच्या कानशिलात लगावली. ‘बिग बॉस मराठी’च्या घरात अशा प्रकारचं कृत्य अमान्य आहे. बिग बॉसदेखील याचा निषेध करतात. कॅप्टन्सीवरुन आर्या आणि निक्कीची जोरदार जुंपली आहे. निक्कीच्या कानशिलात लगावत आर्याने ‘बिग बॉस’च्या नियमांचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे बिग बॉस आर्याला काय शिक्षा ठोठावणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

कलर्स मराठीवरील ‘बिग बॉस मराठी’च्या नव्या कॅप्टन्सी पदाच्या टास्कदरम्यान जादुई हिरा मिळवण्यासाठी अंकिता, वर्षा ताई, जान्हवी, निक्की आणि आर्या यांच्यात चढाओढ झाली. यात जादुई हिरा मिळवण्याच्या झटापटीत आर्या व निक्की यांच्यात जोरात जुंपली. त्याचे अनेक पडसाद सोशल मीडियावर उमटले आहेत. या घटनेनंतर बिग बॉस आता आर्याला शिक्षा सुनावणार आहेत. मात्र यामुळे काही नेटकरी भडकले आहेत. तर निक्कीला अद्दल घडायला हवी होती असे म्हणत काही नेटकऱ्यांनी आर्याचं चक्क कौतुक केलंय.आर्याला जर शिक्षा दिली, घराबाहेर काढलं तर बिग बॉस पाहणंच बंद करू असा इशाराही काही प्रेक्षकांनी दिला आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img