21.7 C
New York

Ajit Pawar : …तर एखाद्या अधिकाऱ्याला मीच निलंबित करेल; अजितदादांनी पोलिसांनाचा भरला दम

Published:

आळंदी परिसरातील दोन नंबरचे धंदे पोलिसांनी तात्काळ बंद न केल्यास एखाद्या अधिकाऱ्यास मीच निलंबित करून पुढील कारवाई करेल असा सज्जड दम अजित पवारांनी पोलिसांनाच भरला आहे. ते चाकणमध्ये आयोजित राष्ट्रवादी कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते. यावेळी अजित पवारांनी पुण्यात नवीन सात पोलीस स्टेशनला तर, पिपंरी चिंचवडमध्ये चार नवीन पोलीस स्टेशनला मंजुरी दिल्याचेही सांगितले.

Ajit Pawar …तर एखादा निलंबित झालाच म्हणून समजा

पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की, मला येथे आल्यानंतर माझ्या मायमाऊलींना एक वाईट बातमी सांगितली की संत ज्ञानेश्वर महाराजांच्या आळंदीत आणि तुकाराम महाराज्यांच्या देहुत चुकीचे आणि दोन नंबरचे धंदे सुरू असल्याचे सांगितले. या दोन्ही ठिकाणी मोठ्या प्रमाणात वारकरी संप्रदाय येतो. तेथे गेल्यानंतर समाधीसमोर नतमस्तक झाल्याशिवाय पुढे जात नाही. पण त्या ठिकाणांवर ज्या प्रकारे दोन नंबरचे धंदे चालले असल्याचे अजित पवार म्हणाले. आज दुपारी सर्व पोलीस अधिकाऱ्यांना बैठकीसाठी बोलावले आहे. त्यात सुरू असलेले सर्व दोन नंबरचे धंदे बंद नाही झाले तर, मी खरचं कुणाला तरी निलंबित करेल किंवा कडक कारवाई करेल असा सज्जड इशारा अजित पवारांनी पोलीस अधिकाऱ्यांना दिला आहे.

लोकसभेत शिंदे-अजितदादांना धक्का; शरद पवार गटाचा राष्ट्रवादी असा उल्लेख

देवांच्या आळंदीत चुकीचे धंदे चालतायेत, वेडे-वाकडे प्रकार होतात. आपण तिथं नतमस्तक झाल्याशिवाय पुढं जात नाही. मागे आलो तेंव्हा दोन तास दर्शन रांग थांबवावी लागली, लोकं म्हणतील हा कोण लागून गेला. जे ह्याला डायरेक्ट दर्शन दिलं जातं. असं भाविक म्हणणार. म्हणून मी आज बाहेरून दर्शन घेतलं. पण आळंदीत घडणारे प्रकार ही चिंताजनक आहे, असे अजित पवार यांनी म्हटले आहे. काही दिवस आम्हाला द्या, चुकलो तर आमचं कान पकडून जाब विचारा. तुमचा तो अधिकार आहे. मात्र भावनिक होऊन काही वेगळा निर्णय घेऊ नका. तुमचा आशीर्वाद द्या, पाठिंबा द्या, अजित पवार यांचे विधान

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img