19.1 C
New York

Vijay Wadettiwar : मित्रपक्षांकडूनच अजितदादांना महायुतीतून बाहेर काढण्याचे प्रयत्न; वडेट्टीवारांचा दावा

Published:

विधानसभा निवडणुका (Vidhansabha Election) अवघ्या काही दोन महिन्यांवर आल्या आहेत. सर्वच पक्षांनी या निवडणुकीसाठी जोरदार कंबर कसली. मात्र, महायुतीमध्ये (Mahayuti) अंतर्गत कलह दिसून येते आहे. शिंदे गट आणि भाजप (BJP) नेत्यांकडून सातत्याने अजित पवार गटावर टीका केली जाते. अशातच आता विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी मोठं वक्तव्य केलं. महायुतीतील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मित्रपक्षच उपमुख्यमंत्री अजित पवारांना (Ajit Pawar) सत्तेबाहेर लोटण्याचा प्रयत्न करत असल्याचा गंभीर वडेट्टीवार यांनी केली.

वडेट्टीवार म्हणाले की, अजित पवार यांना महायुतीतून बाहेर काढण्याचे प्रयत्न त्यांच्याच मित्र पक्षांकडून सुरू आहेत. त्यातील एखादा थेट त्यांच्यावर आरोप करतो, तर दुसरा त्यांचे बॅनर फाडतो. एवढेच नाही अन्य कुणीतरी त्यांच्या बॅनरला काळे फासण्याचा प्रयत्न करतो. सध्या सध्या अजित पवार यांचा पद्धतशीपर अपमान केला जात आहे. अजितदादांना जेवढे दुखावता येईल, तेवढं दुखावलं जात आहे. त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केलं जात आहे. त्यांचा अवमान केला जात आहे. कारण जखम मोठी झाली की माणूस आपोपाप दूर होता.

शरद पवारांच्या मोदींसमोर तीन मोठ्या अटी; म्हणाले, माझ्या गाडीत…

पुढं बोलतांना वडेट्टीवार म्हणाले, श्रेयवादाची लढाई आणि सत्तेच्या लढाईत जो कमजोर दुवा असतो त्याला बाजूला केलं जातं आहे. तसेच प्रयत्न सध्या अजित पवारांच्या बाबतीत महायुतीत सुरू आहेत. तूर्त लोकसभा निवडणुकीनंतर अजित पवारांची उपयोगिता संपल्यामुळं भाजप त्यांना महायुतीतून दूर सारण्याचा पुरेपूर प्रयत्न करत आहे. कदाचित पहिला नंबर अजित पवारांचा असून त्यानंतर त्यानंतर एकनाथ शिंदेंचा नंबर लागले, असा सूचक इशाराही वडेट्टीवार यांनी दिला.

यावेळी बोलतांना वडेट्टीवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे दिल्लीतून पंख छाटण्याचे काम सुरू असल्याचं वक्तव्य केलं. ते म्हणाले की, फडणवीस यांच्या डोक्यावर दिल्लीतून अनेक नेते पाठवले आहेत. त्यांच्यावर करडी नजर ठेवली जात आहे. त्यांचे अधिकार कमी करण्यात आलेत. सध्या त्यांचे पंख छाटण्याचे काम पद्धतशीरपणे सुरू आहे. मोदी आणि शहा यांची जोडगोळी माणूस उपयुक्त वाटत नसला की त्याला बाजूला सारते, हीच त्यांच्या कामाची पद्धत आहे, असं वडेट्टीवार म्हणाले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img