13.2 C
New York

Ajit Pawar : ‘३४ वर्ष उलटली पण मला काही पुरस्कार मिळेना’; अजितदादांचा रोख कुणाकडे?

Published:

‘दिलीपराव मोहिते पाटील यांना उत्कृष्ट वक्तृत्वाबद्दल सर्वोत्कृष्ट भाषण पुरस्कार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते मिळाला. मला मात्र 34 वर्ष झाली तरीही मला काही सर्वोत्कृष्ट भाषणाचा पुरस्कार मिळाला नाही. मला उत्कृष्ट संसदपटू मिळाला नाही. आता काहीच कळेना. मलाही काही सुधारणा सांगा. भाषणात बदल सांगा म्हणजे मलाही पुरस्कार मिळेल.

सभागृहात मी बोलावं म्हणजे मी सुद्धा उत्कृष्ट संसदपटू होईल, असं कुणी सांगत नाही’ अशा शब्दांत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी खासदार सुप्रिया सुळेंना खोचक टोला (Supriya Sule) लगावला. अजित पवार आज खेळ आळंदीच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात त्यांनी भाषणात खासदार सुप्रिया सुळे यांचा नामोल्लेख टाळत खोचक शब्दांत टीका केली. तसेच आमदार दिलीप मोहिते यांचे कौतुक केले.

महाराष्ट्राचा मूड काय? लाडकी बहिण योजनेचा महायुतीला किती फायदा..

अजित पवार पुढे म्हणाले, दिलीपराव मोहितेंना मदत करता आली कारण मी राज्याचा अर्थमंत्री होतो. ते मागणी करायचे आणि मी मागण्या पूर्ण करण्यासाठी सर्वस्व पणाला लावायचो. 2019 ते 2024 या टर्मचा विधिमंडळातील सर्वोत्कृष्ट भाषणाचा पुरस्कार त्यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या (Draupadi Murmu) हस्ते प्रदान करण्यात आला. त्याबद्दल त्यांचं कौतुक झालंय. मी देखील राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने मी त्यांचं अभिनंदन करतो. पुरस्कार त्यांनी जनतेला अर्पण केला हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img