10 C
New York

Laxman Hake : ‘फक्त पाच उमेदवार उभे करुन दाखवा’, लक्ष्मण हाकेंचं मनोज जरांगेंना थेट आव्हान

Published:

राज्यात विधानसभेच्या निवडणुका जवळ (Maharashtra Elections) आल्या आहेत. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनीही चाचपणी सुरू केली आहे. त्यांच्याकडून मतदारांचा आणि इच्छुक उमेदवारांचा आढावा घेतला जात आहे. त्यांच्याकडून उमेदवार मैदानात उतरवले जाणार की आणखी काही वेगळी भूमिका घेतली जाणार याबाबत अद्याप स्पष्टता नाही. तर दुसरीकडे ओबीसी नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी त्यांना थेट आव्हानच दिले आहे. विधानसभेला उमेदवार उभे करुनच दाखवा, असे आव्हान त्यांनी मनोज जरांगे पाटील यांना दिले आहे.

विधानसभेत पोलरायजेशन करणं आणि निवडणुका जिंकणं. ह्याला पाड त्याला पाड याशिवाय त्यांनी काहीच केलं नाही. जरांगेंना ओबीसी माहिती नाही त्यांना काहीच माहिती नाही. त्यामुळे मी त्यांच्याकडून काहीच अपेक्षा करत नाही. ओबीसींना न्याय कसा मिळेल यासाठी आमचा लढा सुरू आहे. पृथ्वीराज चव्हाण असो की एकनाथ शिंदे असो. ज्यांना आम्ही खासदार केलं तेही त्यांनाच पाठिंबा देत आहेत, अशी नाराजी हाके यांनी व्यक्त केली.

दुष्काळ-अतिवृष्टी झळा! भारतात ७.२ टक्क्यांनी शेतकरी आत्महत्या वाढल्या

आता मनोज जरांगेंनी आगामी विधानसभा निवडणुकीत (Elections 2024) फक्त पाच ठिकाणी उमेदवार उभे करून दाखवावे. ते ज्या ठिकाणी उपोषणाला बसतात त्या आंतरवाली सराटीत उमेदवार द्यावा असे आव्हान लक्ष्मण हाके यांनी दिले. आता त्यांच्या या आव्हानाला मनोज जरांगे पाटील कशा प्रकारे प्रत्युत्तर देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दरम्यान, कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी काही दिवसांपूर्वी आंतरवाली सराटीत मध्यरात्री मनोज जरांगे यांची भेट घेतली होती. यावरही हाके यांनी भाष्य करत मुंडे यांच्यावर टीका केली. मनोज जरांगेंना लोकं रात्रीच का भेटतात? या प्रश्नाचं उत्तर त्यांनी जाहीरपणे दिलं पाहिजे. याचं कारण आम्हाला देखील समजलं पाहिजे असे लक्ष्मण हाके यावेळी म्हणाले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img