10 C
New York

Bigg Boss Marathi : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात रंगलीय वर्षा ताईंची चर्चा; काय आहे कारण ?

Published:

‘बिग बॉस मराठी’च्या (Bigg Boss Marathi) घरातील वर्षा ताई (Varsha Usgaonkar) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. (Bigg Boss Marathi) आजही घरातील सदस्य त्यांच्याबद्दल बोलताना दिसणार आहेत. अंकिता (Ankita Walvekar), पॅडी आणि सूरज (Suraj Chavan) गार्डन एरियामध्ये वर्षा ताईंबद्दल बोलताना दिसणार आहेत. अंकिता म्हणतेय, ‘जी गोष्ट आपल्याला जमत नाही..त्यातून लांब व्हा’. तर पॅडी दादा म्हणतोय सॉरी बोलून विषय संपवायला हवा.

निक्की आणि वर्षा ताईंमध्ये देखील भाजीवरुन वाद झालेला पाहायला मिळेल. त्यानंतर निक्की वर्षा ताईंना म्हणतेय,’आता दुसरं काय फेकायचं याचं प्लॅनिंग करताय का?’. निक्कीच्या बोलण्यावर वर्षा ताई म्हणत आहेत,’असं हवेत उडवते मी’. पुढे निक्की आणि अरबाज वर्षा ताईंबद्दल बोलताना दिसून येतील. मराठी मनोरंजनसृष्टीतील हरहुन्नरी अभिनेत्री वर्षा उसगांवकर आणि आपल्या सौंदर्याने अनेकांना घायाळ करणारी बॉलिवूड अभिनेत्री निक्की तांबोळी यांच्यात बिग बॉस मराठीच्या घरातील पहिल्या दिवसापासूनच ‘तू तू मै मै’ झालेलं पाहायला मिळत आहे. आज पॅडी दादा अंकिताला म्हणताय,”एका लेव्हलनंतर वर्षा ताईंवर आपण आवाज वाढवू शकत नाही”. एकंदरीतच वर्षा ताईंनी भाजी फेकलेली घरातील कोणत्याच सदस्याला आवडलेलं नाही आहे.

बिग बॉसच्या घरामध्ये पुन्हा राडा

Bigg Boss Marathi वर्षा ताई अन् निक्कीची तू-तू, मैं-मैं संपेचना

‘बिग बॉस मराठी’च्या नव्या प्रोमोमध्ये निक्की आणि वर्षा ताईंमध्ये भाजीवरुन भांड्याला भांड लागलेलं पाहायला मिळत आहे. निक्की म्हणतेय,’”’इथे लोकांना या घरात लोकांना अन्न मिळत नाही आणि यांनी सरळ भाजी फेकली आहे’. त्यावर उत्तर देत वर्षा ताई म्हणतात,’कारण मला ती खराब वाटली’. पुढे दोघांची तू-तू, मैं-मैं पाहणं मात्र रंजक ठरणार आहे.

Bigg Boss Marathi हे’ सदस्य झालेत नॉमिनेट

‘बिग बॉस मराठी’चा सध्या सातवा आठवडा सुरू आहे. सातव्या आठवड्यातील नॉमिनेशन टास्क नुकताच पार पडला आहे. सातव्या आठवड्यात अभिजीत सावंत, वैभव चव्हाण, वर्षा उसगांवकर, निक्की तांबोळी, अंकिता वालावलकर आणि आर्या जाधव हे सदस्य नॉमिनेट झाले आहेत.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img