Devara Part 1 : ‘देवरा’ पार्ट १’ चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा पाहायला मिळत आहे. जान्हवी कपूर आणि ज्युनियर एनटीआर पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करणार आहे. २७ सप्टेंबरला हा दाक्षिणात्य सुपरस्टार असलेला चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) पहिल्यांदा या चित्रपटाच्या माध्यतून दाक्षिणात्य सिनेसृष्टीत पाऊल ठेवत आहेत. या चित्रपटाच्या गाण्यांनी आणि ट्रेलरने प्रेक्षकांची उत्सुकता आता वाढवली आहे. बिग बजेट असा हा सिनेमा आहे.
श्रुती मराठे ही मराठी अभिनेत्री या चित्रपटात झळकणार आहे. आपल्या सोशल मीडियावर यासंबंधित श्रुतीने पोस्ट केलीय. या पोस्टमध्ये अभिनेत्री चित्रपटाचे डबिंग करताना दिसत आहे. याआधी देखील श्रुती मराठेनी अनेक चित्रपट गाजवले आहेत. तमिळ, कन्नड, मराठी, हिंदी भाषांमध्ये काम केले आहे.देवरा पार्ट १ या चित्रपटाच्या डबिंगचे फोटो अलीकडेच या अभिनेत्रीने शेअर केले आहेत. चाहत्यांनी श्रुतीच्या या पोस्टवर प्रेमाचा वर्षाव केला आहे. श्रुती टॉलिवूडमधे या चित्रपटामधून पदार्पण करणार आहे. या अभिनेत्रीवर चाहत्यांनी आता प्रेमाचा वर्षाव केला आहे. ‘देवरा: पार्ट १’ या चित्रपटात तुम्हाला ॲक्शनचा धमाका पाहायला मिळणार आहे. श्रुती मराठे या चित्रपटात ज्युनिअर एनटीआरच्या पत्नीची भूमिका करणार आहे.
‘बिग बॉस मराठी’च्या घरात रंगलीय वर्षा ताईंची चर्चा; काय आहे कारण ?
जान्हवी कपूर, सैफी अली खान, दिग्गज कलाकार ज्युनियर एनटीआर, यांच्यासोबत अभिनेत्री श्रुती मराठे हिला काम करण्याची संधी मिळाली आहे.३०० कोटींचा हा चित्रपट आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी कलाकारांचीही उत्सुकता आहे. आपल्या कामामुळे श्रुती मराठे कायमच चर्चेत असते. तिच्या मराठी चित्रपटाची प्रेक्षक आतूरतेने वाट पाहत आहेत.